निशांत देवचे आव्हान समाप्त निशांत देव
वृत्तसंस्था/ बुस्टो अॅरिसिझिओ (इटली)
येथे सुरू असलेल्या पहिल्या विश्व ऑलिंपिक पात्र फेरीच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुरूषांच्या 71 किलो वजन गटात भारताच्या निशांत देवला उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली. या पात्र फेरीच्या स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्धांची कामगिरी निराशजनक झाली असून त्यांना खाली हाताने परतावे लागत आहे.
पुरूषांच्या 71 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या ओमारी जोन्सने निशांत देवचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत उपांत्यफेरी गाठली. जोन्सने 2021 च्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. या स्पर्धेत भारताच्या नऊ स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला होता. पण एकाही स्पर्धकाला पदक मिळविता आले नाही. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि इटलीतील ही स्पर्धा पॅरीस ऑलिंपिकसाठी पात्र फेरीच्या म्हणून ओळखल्या गेल्या. मात्र महिलांच्या विभागात भारताच्या निखात झरीनने 50 किलो वजन गटात, प्रिती पवारने 54 किलो वजन गटात, परवीन हुडाने 57 किलो गटात तर टोकिओ ऑलिंपिक स्पर्धेतील कास्यपदक विजेती लवलिना बोर्गोहेन 75 किलो गटात यांनी पॅरिस ऑलिंपिकचे तिकीट यापूर्वीच आरक्षित केले आहे. आता पॅरिस ऑलिंपिकसाठी दुसरी पात्र फेरीची स्पर्धा बँकॉकमध्ये 23 मे ते 3 जून दरम्यान होणार आहे. या पात्र फेरीच्या स्पर्धेसाठी 45 ते 51 मुष्टीयोद्धे पात्र ठरतील.
Home महत्वाची बातमी निशांत देवचे आव्हान समाप्त निशांत देव
निशांत देवचे आव्हान समाप्त निशांत देव
वृत्तसंस्था/ बुस्टो अॅरिसिझिओ (इटली) येथे सुरू असलेल्या पहिल्या विश्व ऑलिंपिक पात्र फेरीच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुरूषांच्या 71 किलो वजन गटात भारताच्या निशांत देवला उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली. या पात्र फेरीच्या स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्धांची कामगिरी निराशजनक झाली असून त्यांना खाली हाताने परतावे लागत आहे. पुरूषांच्या 71 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या ओमारी जोन्सने निशांत […]
