चुरशीच्या सामन्यात निशांत देव पराभूत, ऑलिंपिक पदक थोडक्यात हुकलं

भारतीय बॉक्सर निशांत देवला मेक्सिकोच्या मार्को वर्देकडून पराभव पत्करावा लागला.दुसरा सीडेड बॉक्सर मार्को वर्दे हा पॅन अमेरिकन गेम्सचा सध्याचा चॅम्पियन आहे. निशांत देवच्या पराभवामुळे भारतीय पुरुष बॉक्सिंगमधला 16 वर्षांपासून सुरू असलेला ऑलिंपिक पदकाचा …

चुरशीच्या सामन्यात निशांत देव पराभूत, ऑलिंपिक पदक थोडक्यात हुकलं

भारतीय बॉक्सर निशांत देवला मेक्सिकोच्या मार्को वर्देकडून पराभव पत्करावा लागला.दुसरा सीडेड बॉक्सर मार्को वर्दे हा पॅन अमेरिकन गेम्सचा सध्याचा चॅम्पियन आहे.

निशांत देवच्या पराभवामुळे भारतीय पुरुष बॉक्सिंगमधला 16 वर्षांपासून सुरू असलेला ऑलिंपिक पदकाचा दुष्काळ सुरूच राहणार आहे.बॉक्सिंगमध्ये विजेंदर सिंह हा एकमेव पदक विजेता आहे. त्याने 2008 च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं.

महिला वर्गात 2012 मध्ये मेरी कोम कांस्य पदक जिंकली होती. पुरुष वर्गात विजेंदर सिंहनंतर रियो, टोक्यो ऑलिंपिकमध्ये बॉक्सिंग मध्ये कोणतेही पदक मिळालेलं नाही.

 

निशांतला पदक मिळवण्यासाठी मेक्सिकोच्या मार्को वर्देचं आव्हान असेल. दुसऱ्या क्रमांचा बॉक्सर मार्को वेर्दे पॅन अमेरिकन गेम्स मध्ये सध्याचा विजेता आहे.

 

निशांतची पहिल्या प्रयत्नाचं कौतुक

निशांत वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत 2021 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळला.

 

त्यावेळी तो उपांत्यपूर्व फेरीत पोहोचून पदक जिंकू शकला नाही, मात्र तिथपर्यंत त्याची वाटचाल अतिशय स्तुत्य होती.

 

उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने हंगेरीचा नऊ वेळा राष्ट्रीय चॅम्पियन असलेला लाजलो कोझाक, मॉरिशसकडून दोनदा ऑलिंपिक खेळलेला मेर्विन क्लेअर आणि मेक्सिकोच्या मार्को अल्वारेजचा पराभव केला. त्याच्या खेळाची खूप चर्चा झाली.

 

पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळवणारा पहिला बॉक्सर

निशांत देव ने या वर्षी मे महिन्यात बँकॉकमध्ये झालेल्या आयबीए वर्ल्ड चॅम्पिअनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत मालदीवच्या वेसिली सोवोटरीचा पराभव करून ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळवला होता.

 

पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळवणारा तो पहिला बॉक्सर आहे. त्याआधी महिला बॉक्सरनीच पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळाला होता.

या सामन्यात निशांत देवने प्रतिस्पर्ध्याला अतिशय चतुराईने ठोसे हाणले होते. त्याचं सगळ्यांनीच कौतुक केलं होतं.

 

या सामन्यात 5-0 ने पराभव केल्यावर तो अतिशय परिपक्व बॉक्सर झाल्याचं मत व्यक्त करण्यात आलं होतं. सामन्यात कधी आणि काय करायची गरज आहे याची त्याला चांगलीच जाणीव आहे.

 

पराभवातून घेतला धडा

या वर्षाच्या सुरुवातीला इटलीमध्ये झालेल्या ऑलिंपिक क्वालिफायरमध्ये त्याच्या पदरी निराशा आली होती. कारण अमेरिकेच्या ओमारी जोंसने त्याचा उपांत्यपूर्व फेरीत अटीतटीच्या सामन्यात पराभव केला होता.

 

या पराभवाने खचून न जाता त्याने त्याचे वडील पवन देव यांच्याबरोबर बसून दीर्घ चर्चा केली आणि भविष्याची योजना आखली आणि दोन महिन्यांपर्यंत प्रचंड मेहनत घेतली. तसंच उणिवांवर काम केलं. त्याचा परिणाम बँकॉकमध्ये ऑलिंपिक क्वालिफायरमध्ये दिसला.

 

जेव्हा आईस्क्रीम प्रेम महागात पडलं होतं

ताश्कंद येथे झालेल्या वर्ल्डकपचा हा किस्सा आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेला असताना, तो जेव्हा हॉटेलमध्ये गेला, तेव्हा त्याने पाहिलं की बाहेर आईस्क्रीमवाला उभा आहे.त्याचा मनावर ताबा राहिला नाही आणि तो आईस्क्रीम खायला गेला आणि आपल्या पसंतीचं आईस्क्रीम खाऊन मन शांत केलं.

 

पण आईस्क्रीम खाऊन जेव्हा दुसऱ्या दिवशी तो वजन करायला गेला, तेव्हा निर्धारित वजनापेक्षा जास्त निघालं.

त्यांचा पहिला सामना क्युबाच्या जोर्गे क्युलरशी होता. त्याने प्रतिस्पर्ध्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वजन कसं कमी करायचा याचाच तो विचार करत राहिला. त्यासाठी तो दिवसभर धावतच राहिला.

 

याचा फायदा असा झाला की, वजन कमी झालंच पण सामन्याचाही विचार न केल्यानं नकारात्मक विचारही आले नाही.याचा त्याला सामन्यात फायदा झाला आणि विश्वचषकात कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय बॉक्सरच्या मांदियाळीत त्याचा समावेश झाला.

 

2022 मध्ये आले बरेच चढ उतार

निशांत पहिल्यांदा जेव्हा 2021 मध्ये वर्ल्ड कपमध्ये भाग घ्यायला गेला, तेव्हा आपल्या खेळामुळे लोकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला. मात्र पूर्ण वेळ खांद्याच्या दुखापतीने तो बेजार झाला होता. सामन्यांच्या वेळीही तो जायबंदी होता.

 

जेव्हा तो पटियाला शिबिरात गेला, तेव्हा वेदना खूपच वाढल्या. तपासणी केल्यावर लक्षात आलं की जुन्या दुखापती पुन्हा उमळल्या आहेत.

 

तो नऊ वर्षांचा असताना जिन्यावरून पडल्याने तो जखमी झाला होता. तेव्हा ऑपरेशन करून त्याच्या शरीरात रॉड टाकला होता. त्यात दहा वर्षानंतर संसर्ग झाला होता.

 

त्यामुळे त्याला सर्जरी करावी लागली. त्याचा परिणाम असा झाला की, त्याला 9 महिने रिंगणाच्या बाहेर रहावं लागलं. मात्र, या काळात त्याने नकारात्मक विचारांचा स्वत:वर प्रभाव पडू दिला नाही.

 

बॉक्सर मनोजकडून घेतली प्रेरणा

करनालच्या जमीनदार कुटुंबात जन्मलेल्या निशांतला लहानपणापासूनच बॉक्सिंग आवडायचं. त्याचे मामा जर्मनीत व्यावसायिक बॉक्सर होते.

 

2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत मनोज कुमारने सुवर्ण पदक जिंकल्यावर त्याला बॉक्सिंग खेळायची प्रेरणा मिळाली.

 

त्याने करनालमध्ये राहणाऱ्या सुरेंद्र चौहान यांच्याकडून प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्याचे वडील पहाटे 4 वाजता उठून त्याला प्रशिक्षणाला घेऊन जायचे. हे वर्षानुवर्षं सुरू राहिलं. त्यामुळे निशांतच्या यशात वडिलांचंही तितकंच योगदान आहे.

लहापणी तो 100 आणि 200 मीटरची धावण्याची स्पर्धा आणि स्केटिंगमध्येही भाग घ्यायचा.

 

स्केटिंग करता करता एकदा त्यांच्या स्केटचं एक चाक निघून गेलं आणि मग तो धावून ही स्पर्धा जिंकला होता. यावरून त्याचा आत्मविश्वास दिसून येतो.

 

सँटियागो यांच्या शिबिराचा फायदा

तो पहिल्यांदा 2019 मध्ये झालेल्या सीनियर नॅशनल चॅम्पियनशिपसाठी कर्नाटकचं प्रतिनिधित्व केलं.

 

तो उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे जाऊ शकला नाही. मात्र त्या दरम्यान परफॉर्मन्स डायरेक्टर सँटियागो यांची नजर त्याच्यावर पडली आणि त्यांनी निशांतला राष्ट्रीय शिबिरात सहभागी करून घेतलं.त्याचा निशांतला भरपूर फायदा झाला. खऱ्या अर्थाने त्याच्या पंखात बळ आणि तो बरंच काही शिकला. निशांत देवबद्दल असंही बोललं जातं की, त्याचे विचार स्वच्छ आहेत आणि यशासाठी तो काहीही करू शकतो.

Published By- Priya Dixit

 

 

 

 

 

Go to Source