केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत निर्मला सीतारामन मोरारजी देसाईंचा ‘तो’ विक्रम मागे टाकणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (23 जुलै) संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.इन्कम टॅक्स रचनेतील बदलांवर सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. तसंच कोणत्या गोष्टी महाग किंवा स्वस्त होणार हेही महत्त्वाचं ठरणार आहे. सीतारामन राज्यसभेत 2024-25 या वर्षासाठी …
केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत निर्मला सीतारामन मोरारजी देसाईंचा ‘तो’ विक्रम मागे टाकणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (23 जुलै) संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

 

इन्कम टॅक्स रचनेतील बदलांवर सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. तसंच कोणत्या गोष्टी महाग किंवा स्वस्त होणार हेही महत्त्वाचं ठरणार आहे.

 

सीतारामन राज्यसभेत 2024-25 या वर्षासाठी सरकारच्या अंदाजे प्राप्ती आणि खर्चाचे विधान (Estimateed Receipts and Expenditure) पटलावर मांडतील. त्यानंतर लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडतील.

 

याआधी 1 फेब्रुवारी 2024 रोजी सीतारामन यांनी केंद्राचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता. आता लोकसभा निवडणुकीनंतर त्या संपूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प मांडतील.

 

सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान सीतारामन यांना मिळणार आहे.

 

याआधी मोराजी देसाई यांनी सलग सहावेळा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांचा हा विक्रम सीतारामन मागे टाकतील. देसाई यांनी 1959 ते 1964 या दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री म्हणून पाचवेळा वार्षिक अर्थसंकल्प मांडला. तर त्यानंतर एकदा अंतरिम अर्थसंकल्प मांडला.

 

दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्था ही वेगाने वाढत असल्याचा दावा, मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन यांनी म्हटलं आहे.

 

सोमवारी (22 जुलै) आर्थिक सर्व्हेक्षण सादर केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी भारताचा विकास दर 6.5 ते 7 टक्के राहील, असंही म्हटलं

 

 

Go to Source