निपाणी एफसी इलेव्हन स्टार, युनायटेड गोवन्स विजयी

लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धा बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात इलेव्हन स्टार संघाने चौगुले स्पोर्ट्सचा, निपाणी एफसीने झिगझॉगचा तर युनायटेड गोवन्सने युनायटेड युथचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. सोमवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात निपाणी स्पोर्टस झिगझॉग संघाचा 4-0 असा पराभव केला. […]

निपाणी एफसी इलेव्हन स्टार, युनायटेड गोवन्स विजयी

लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात इलेव्हन स्टार संघाने चौगुले स्पोर्ट्सचा, निपाणी एफसीने झिगझॉगचा तर युनायटेड गोवन्सने युनायटेड युथचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. सोमवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात निपाणी स्पोर्टस झिगझॉग संघाचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात 14 व 21 व्या मिनिटाला ऋषिकेश बावडेकरच्या पासवर शोहब खानने सलग 2 गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 40 व्या मिनिटाला ओमकार मानेच्या पासवर रामदास जाधवने तिसरा गोल केला. तर 60 व्या मिनिटाला शोहब खानच्या पासवर ऋषिकेश बावडेकरने चौथा गोल करून 4-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात झिगझॉग संघाला गोल करण्यास अपयश आले. दुसऱ्या सामन्यात इलेव्हन स्टारने चौगुले स्पोर्टसचा 3-1 असा पराभव केला. या सामन्यात 22 व्या मिनिटाला मोनिश पटेलच्या पासवर विकी गॉटमने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 46 व्या मिनिटाला विकी गॉटमच्या पासवर राहित मुगुटखानने दुसरा गोल केला. तर 61 व्या मिनिटाला रोहितच्या पासवर मोनिश पटेलने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी इलेव्हन स्टारला मिळवून दिली. चौगुलेतर्फे राकेशने 56 व्या मिनिटाला गोल करून 1-2 अशी आघाडी कमी केली. तिसऱ्या सामन्यात युनायटेड गोवन्सने युनायटेड युथचा 5-0 असा पराभव केला. 5 व्या मिनिटाला युनायटेड गोवन्सच्या साकीबच्या पासवर शाहिद एमने पहिला गोल केला. 8 व्या मिनिटाला नवलच्या पासवर आकाश गोपालने दुसरा गोल केला. तर 29 व्या मिनिटाला आर्यनच्या पासवर शाहिद केने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 35 व 38 व्या मिनिटाला शाहिद केच्या पासवर नवल एने सलग 2 गोल करून 5-0 ची आघाडी युनायटेड गोवन्सला मिळवून दिली.
मंगळवारचे सामने

गोवन्स एससी वि. फँन्को दुपारी 1 वाजता
साईराज एफसी वि. टिळकवाडी एफ ए दुपारी 2.30 वा.
वायएमसीए वि. मोहब्ल्यू दुपारी 4 वाजता.