निलेश राणेंनी केली भगवंतगड किल्ल्याची पाहणी

किल्ल्यावरील सिद्धेश्वर मंदिराची लवकरात लवकर दुरुस्ती करणार आचरा प्रतिनिधी मागच्या वर्षभरात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर भरपूर विकास निधी या जिल्ह्यासाठी प्राप्त झाला.पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदार संघासाठी झुकते माप देत करोडो रुपयांचा विकास निधी मिळाला आहे.तरी गेल्या नऊ वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अजूनही भरपूर प्रमाणात विकासनिधीची आवश्यकता आहे. या सरकारच्या माध्यमातून तोही […]

निलेश राणेंनी केली भगवंतगड किल्ल्याची पाहणी

किल्ल्यावरील सिद्धेश्वर मंदिराची लवकरात लवकर दुरुस्ती करणार
आचरा प्रतिनिधी
मागच्या वर्षभरात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर भरपूर विकास निधी या जिल्ह्यासाठी प्राप्त झाला.पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदार संघासाठी झुकते माप देत करोडो रुपयांचा विकास निधी मिळाला आहे.तरी गेल्या नऊ वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अजूनही भरपूर प्रमाणात विकासनिधीची आवश्यकता आहे. या सरकारच्या माध्यमातून तोही पूर्ण करु असा विश्वास माजी खासदार निलेश राणे यांनी भगवंतगड किल्ल्यावर व्यक्त केला. यावेळी त्यांनी किल्ल्यावरील सिद्धेश्वर मंदिराची लवकरात लवकर मंदिराची दुरुस्ती करणार असल्याचे सांगितले.
माजी खासदार व भाजप नेते निलेश राणे यांनी गुरुवारी सकाळी चढण्यासाठी अवघड असलेल्या भगवंतगड किल्ल्यावर भेट देत पहाणी केली. यावेळी त्यांच्या सोबत भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालूकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, संतोष कोदे, बाबा परब,अशोक सावंत, मंगेश गावकर,आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, राजन गावकर, महेश मांजरेकर, आचरा ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, पंकज आचरेकर,चंदू कदम चिंदर येथील दत्ता वराडकर,मनोज हडकर, संतोष गावकर,यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. यावेळी निलेश राणे यांनी किल्ला परिसराची पाहणी केली.