न्यूझीलंड-बांगलादेश टी-20 मालिका बरोबरीत

शेवटच्या सामन्यात न्यूझीलंड विजयी : सँटनर सामनावीर, शोरीफुल इस्लाम मालिकावीर वृत्तसंस्था/ माऊंट माँगनुई (न्यूझीलंड) रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने बांगलादेशचा डकवर्थ लेव्हिस नियमाच्या आधारे 17 धावांनी पराभव केला. या विजयामुळे उभय संघातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. न्यूझीलंडच्या सँटनरला ‘सामनावीर’ तर बांगलादेशच्या शोरीफुल इस्लामला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित […]

न्यूझीलंड-बांगलादेश टी-20 मालिका बरोबरीत

शेवटच्या सामन्यात न्यूझीलंड विजयी : सँटनर सामनावीर, शोरीफुल इस्लाम मालिकावीर
वृत्तसंस्था/ माऊंट माँगनुई (न्यूझीलंड)
रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने बांगलादेशचा डकवर्थ लेव्हिस नियमाच्या आधारे 17 धावांनी पराभव केला. या विजयामुळे उभय संघातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. न्यूझीलंडच्या सँटनरला ‘सामनावीर’ तर बांगलादेशच्या शोरीफुल इस्लामला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने न्यूझीलंडचा पाच गड्यांनी पराभव करुन आघाडी मिळविली होती. तर दुसरा सामना पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या सामन्यात केवळ 11 षटकांचा खेळ झाला होता. रविवारच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशचा डाव 19.2 षटकात 110 धावात आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव सुरू होण्यापूर्वी पावसाचा अडथळा आला. पावसामुळे बराचवेळ खेळ थांबवावा लागला. खेळ थांबल्यानंतर मैदानाची पाहणी करुन पंचांनी तो पुढे सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण न्यूझीलंडला डकवर्थ लेविस नियमाच्या आधारे 14.4 षटकात विजयासाठी 79 धावांचे नवे उद्दिष्ट देण्यात आले. न्यूझीलंडने 14.4 षटकात 5 बाद 95 धावा जमवित हा सामना 17 धावांनी जिंकला. या विजयामुळे बांगलादेशने न्यूझीलंडच्या भूमीवर पहिलीच मालिका जिंकण्याची संधी गमावली. न्यूझीलंडच्या डावातील 15 वे षटक चालू असताना पुन्हा मुसळधार पावसाला प्रारंभ झाल्याने खेळ थांबवावा लागला. दरम्यान डकवर्थ लेव्हिस नियमाच्या आधारे न्यूझीलंडने हा सामना 17 धावांनी जिंकला.
बांगलादेशच्या डावामध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. बांगलादेशच्या पाच फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. कर्णधार नजमुल हुसेन शांतोने 15 चेंडूत 4 चौकारांसह 17, रिदॉयने 18 चेंडूत 2 चौकारांसह 16, अफिफ हुसेनने 13 चेंडूत 2 चौकारांसह 14, तालुकदारने 10 चेंडूत 2 चौकारांसह 10 आणि रिशाद हुसेनने 13 चेंडूत 10 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 12 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशला अवांतराच्या रुपात 11 धावा मिळाल्या. न्यूझीलंडतर्फे मिचेल सँटेनर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 16 धावात 4 गडी बाद केले. टीम साऊदी, अॅडॅम मिलेनी आणि बेन सीअर्स यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. पहिल्या पॉवर प्ले दरम्यानच्या 6 षटकात बांगलादेशने 45 धावा जमविताना 3 गडी गमविले होते.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडने 14.4 षटकात 5 बाद 95 धावांपर्यंत मजल मारली होती. सलामीचा फलंदाज अॅलनने 31 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 38 तर निश्चामने 20 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 28 तर कर्णधार सँटेनरने 20 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 18 धावा जमविल्या. न्यूझीलंडला अवांतराच्या रुपात 7 धावा मिळाल्या. न्यूझीलंडच्या डावामध्ये 12 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी 7 ते 16 षटकात केवळ 32 धावा जमविल्या होत्या. न्यूझीलंडच्या डावात 4 षटकार आणि 6 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे मेहदी हसन मिराझ आणि शोरीफुल इस्लाम यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सँटेनर आणि निश्चाम यांनी 46 धावांची भागिदारी केली. 15 व्या षटकाअखेर न्यूझीलंडने 5 बाद 95 धावा जमवित ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 19.2 षटकात सर्व बाद 110 (नजमुल हुसेन शांतो 17, रिदॉय 16, अफिफ हुसेन 14, रिषाद हुसेन 10, तालुकदार 10, सँटनर 4-16, साऊदी 2-25, मिल्ने 2-23,