नवा व्हेरिएंट आणि प्रदूषण
एका बाजूला सौम्य लक्षणांचा जेएन.1 हा व्हेरिएंट प्रभावासाठी नेभळट ठरवला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला याच काळात मुंबईत पसरलेले प्रदूषण कळीचा मुद्दा ठरत आहे. अशा सौम्य लक्षणांच्या जेएन.1 व्हेरिएंट प्रदुषकांसह शरिरात गेल्यास न्युमोनिया होण्याची शक्यता आहे आणि न्युमोनिया झाल्यास पुढील मल्टीपल ऑर्गन फेल्युएर, शरीरातील प्राणवायू प्रमाण खालावणे असे बरेच काही गंभीर परिणाम उद्भवू शकतात… म्हणूनच सौम्य लक्षणांचा तसेच नेभळट म्हणून हिणवलेल्या जेएन.1 व्हेरिएंट पासून वाचण्यासाठी कोविड वर्तणूकीवर भर देण्याची गरज आहे.
देशातील कोविड ओमिक्रॉनचा उपप्रकारातील जेएन.1 या नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला. तर दुसरा ऊग्ण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिह्यात आढळला. आतापर्यंत टप्प्याटप्प्याने का असेना पण जिह्याजिह्यात ऊग्ण वाढत असल्याची नोंद होत आहे. जेएन.1 या सौम्य लक्षणांच्या व्हेरिएंट ऊग्णसंख्येचा उद्रेक गुऊवारी 4 जानेवारी रोजी अनुभवयास मिळाला. यादिवशी तब्बल 78 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे राज्यातील जेएन.1 व्हेरिएंट ऊग्णांची संख्या 110 वर पोहचली होती. तो पर्यंत जेएन.1 व्हेरिएंटचे 32 ऊग्ण एवढेच होते. तर राज्यात कालच्या शनिवारी जेएन.1 व्हेरिएंट ऊग्णसंख्या 139 वर पोहचली. जिल्हानिहाय पाहिल्यास पुणे जिल्हा 91, नागपूर 30, ठाणे 5, बीड 3, छ. संभाजीनगर आणि नांदेड 2, कोल्हापूर, अकोला, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सोलापूर आणि नागपूर या ठिकाणी अनुक्रमे 1 असे राज्यात एकूण 139 जेएन.1 व्हेरिएंटचे ऊग्ण झाले आहेत. कोविडचा जेएन.1 प्रकार आढळल्याने पेंद्र सरकार सतर्क झाले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्यांना इन्फ्लूएंझा सारख्या आजार आणि गंभीर तीव्र श्वसन आजाराच्या रूग्णांचा अहवाल देण्यासाठी आणि एकात्मिक आरोग्य माहिती
प्लॅटफॉर्मवर माहिती अपलोड करण्यासाठी सांगितले आहे, जेणेकरून ट्रेंड ओळखता येईल. राज्यांनी निश्चित केले पाहिजे की पुरेशी चाचणी केल्या जात आहेत. तर मुंबई पातळीवर आरटीपीसीआर आणि जलद चाचणी कऊन आरटीपीसीआरमध्ये पॉझिटिव्ह येणारे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात आहेत. पालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी पेंद्र आणि राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वाच्या पालनावर अधिक भर देण्यास सांगितले आहे. तसेच लोकांनी घाबरून न जाता गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला, फ्लू असेल तर घरी आराम करा, हाताच्या स्वच्छतेची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान जेएन.1 व्हेरिएंटचा संसर्ग वेग पाहता तसेच त्याची लक्षणे पाहता सौम्य वाटत आहे. मात्र कोविड वर्तणूकीचे पालन न केल्यास हा व्हेरिएंट प्रभावी ठरण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञ सांगत आहेत. तसेच सध्या मुंबईसारख्या शहरातील प्रदूषण पाहता अशा व्हेरिएंटसाठी वातावरण पूरक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जेएन.1 व्हेरिएंट आणि मुंबईतील प्रदूषण याचा संबंध जोडताना ज्येष्ठ फुफ्फुस तज्ञ डॉ. राजेंद्र ननावरे यांनी सावधगिरीचा इशारा दिला. जेएन.1 हा व्हेरिएंट आणि पहिल्या लाटेतील व्हेरिएंट यातील फरक विषद करण्यात आला. कोविडच्या सुरुवातीला डेल्टा वायरस आला होता. कोविडच्या सुऊवातीच्या टप्प्यात जेवढे नवीन विषाणू आले ते थेट श्वसन यंत्रणेच्या तळापर्यंत पोहचत. म्हणजे त्या लाटेतील विषाणू शरीरातील प्रतिबंधात्मक असणारी सर्व बंधने तोडून थेट श्वसन यंत्रणेच्या बुडाशी पोहचत. श्वसन यंत्रणेचा वरील भाग (अप्पर रेस्पिरेटरी) आणि खालील भाग (लोअर रेस्पिरेटरी) असे दोन भाग आहेत. यात अप्पर रेस्पिरेटरी भागात घसा, गळा किंवा कंठ हे भाग येतात. तर लोअर रेस्पिरेटरी श्वसन यंत्रणेत श्वसन नलिकेपासून फुफ्फुसापर्यंतचा भाग येत आहे. कोविडच्या सुऊवातीला आलेले सर्व व्हेरिएंट हे श्वसन यंत्रणेच्या तळाशी जात असत. तर ओमिक्रॉनचे विषाणू उपप्रकार हे श्वसन यंत्रणेच्या वरील भागाला प्रभावित करत आहेत. आधीचा डेल्टा विषाणू प्रतिबंधात्मक भाग म्हणजे सिलिया कंठ हे भाग भेदून लोअर रेस्पिरेटरी भागात पोहचत असे. त्यामुळे रुग्णाला न्युमोनिया होत असे. न्युमोनिया संसर्ग झाल्यावर श्वसनाला त्रास होणे त्याच वेळी शरीरातील प्राणवायू कमी होणे हे दोन मोठे बदल शरीरात घडत. यातून ऊग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र सध्या जेएन.1 हा
ओमिक्रॉनचा उपप्रकार आहे. या व्हेरिएंटचा आरओ
फॅक्टर वाईट असल्याने तो संसर्ग वेगात आहे. मात्र जेएन.1 हा व्हेरिएंट श्वसन यंत्रणेच्या तळाशी जात नाही. त्यामुळे न्युमोनिया होत नाही. यातून ऊग्णाच्या शरीरातील ऑक्सिजन कमी होण्याचे प्रकार घडत नसल्याने ऊग्ण गंभीर स्थितीत फारच कमी प्रमाणात जात आहेत. ही दिलासादायी बाब आहे. तसेच शरीरातील वायू कोषात रक्तातील प्राणवायू आणि कार्बनडायऑक्साईड या वायूंची देवाण घेवाण होत असते. या वायू कोषात हे दोन सेल असून एका सेलला न्युमोसाईट 1 आणि दुसऱ्या सेलला न्युमोसाईट2 म्हणतात. न्युमोसाईट 2 निकामी झाल्यास न्युमोसाईट1 हा न्युमोसाईट2 तयार करत असे. मात्र डेल्टा उपप्रकार (पहिल्या लाटेतील उपप्रकार) न्युमोसाईट1 सेलला निकामी करत असे. प्रमुख असणाऱ्या न्युमोसाईट1 निकामी झाल्यावर न्युमोसाईट2 तयारच होत नसे. त्यामुळे शरीराला प्राणवायू पेहचण्याचे काम होत नसे. यातून संपूर्ण फुफ्फुसाला सूज येत असे. फुफ्फुसाला सूज येणे म्हणजे न्युमोनिया संसर्ग होणे होय. न्युमोनिया झाल्यानंतर शरीराला ऑक्सिजन पुरवठा होत नसे. प्राणवायू पुरवठा बंद झाल्यावर रक्तातील ऑक्सिजन पातळी कमी होत असे. यातून अंतर्गत अवयव काम करणे थांबायचे. यातून मग मल्टीपल ऑर्गन
डिसऑर्डरने ऊग्ण दगावत असे. पहिल्या लाटेतील व्हेरिएंट आणि सध्या येणारे व्हेरिएंट यातील हा प्रमुख फरक आहे. तसेच रोग प्रतिकारशक्ति चांगली असण़ाऱ्यांवर कोविड कोणता परिणाम करत नाही. मात्र सहव्याधी, मधूमेही, उच्च रक्तदाबाचे ऊग्ण, कर्कऊग्ण आणि गंभीर आजार असणाऱ्या ऊग्णांना न्युमोनिया झाल्यास कोविड दुष्परिणाम करत असे. सध्याच्या व्हेरिएंटमुळे न्युमोनिया होण्याची भीती नसल्याने याला सौम्य लक्षणांचा आजार म्हटलं जात आहे. दरम्यान हा व्हेरिएंट सौम्य लक्षणाचा असला तरी कोविडचा उपप्रकार असून सध्या सुरु असलेल्या प्रदुषित वातावरणात तो वेगाने पसरत असल्याने गंभीर आहे. तथापि सध्या मुंबईवर ढगाळ वातावरण असून प्रदुषित वातावरणात जाण्यास अडचण होत आहे. तसेच प्रदुषणाची पातळी 100 च्या वर वाढल्यावर धोकादायक तर 200 च्या वर अति धोकादायक आणि निर्देशांक 300 च्या वर गेल्यावर रोज वीस सिगारेट इतका धोकादायक वायू शरीरात जाण्याचा धोका असतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण शरीरात जात असल्यास रोगप्रतिकारशक्ति कमी होते. अशा प्रदूषणाच्या ठिकाणी हा व्हेरिएंट असल्यास शरीरात न्युमोनिया तयार कऊ शकतो. यातून गंभीर परिणाम होऊ शकतात. दरम्यान मुंबई शहरात हवा दर्जा निर्देशांक 150 पर्यंत असतो. काही वेळा काही ठिकाणी हा निर्देशांक 150 ओलांडून 200 किंवा 250 पर्यंत जातो. अशा वेळी ठिकाणी या सौम्य व्हेरिएंटचादेखील प्रभाव वाढू शकतो. तेव्हा मास्क तसेच कोविड वर्तणुकीवर भर दिला जात आहे.
राम खांदारे
Home महत्वाची बातमी नवा व्हेरिएंट आणि प्रदूषण
नवा व्हेरिएंट आणि प्रदूषण
एका बाजूला सौम्य लक्षणांचा जेएन.1 हा व्हेरिएंट प्रभावासाठी नेभळट ठरवला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला याच काळात मुंबईत पसरलेले प्रदूषण कळीचा मुद्दा ठरत आहे. अशा सौम्य लक्षणांच्या जेएन.1 व्हेरिएंट प्रदुषकांसह शरिरात गेल्यास न्युमोनिया होण्याची शक्यता आहे आणि न्युमोनिया झाल्यास पुढील मल्टीपल ऑर्गन फेल्युएर, शरीरातील प्राणवायू प्रमाण खालावणे असे बरेच काही गंभीर परिणाम उद्भवू शकतात… म्हणूनच […]