कूपनलिका खोदाईसाठी कॅन्टोन्मेंटची नवी नियमावली
पूर्वपरवानगीशिवाय खोदता येणार नाही कूपनलिका
बेळगाव : पाण्याचा अतिरिक्त उपसा टाळण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने नवीन नियमावली जाहीर केली आहे. यापुढे कूपनलिका खोदाई करण्यापूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगीनंतरच कूपनलिकांची खोदाई करता येणार आहे. तसेच यासाठी आक्षेप मागविण्यात आले असून 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. कॅम्प व किल्ला परिसरात मागील काही दिवसात कूपनलिकांद्वारे पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याला आवर घालण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डने बेळगावमधील निवडक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन नागरिकांचे आक्षेप मागविले आहेत. बेळगावसह सर्वच कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये पाण्याचा उपसा थांबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मनाला वाटेल त्या ठिकाणी नागरिकांकडून काढण्यात येणाऱ्या कूपनलिकांना यापुढे निर्बंध बसणार आहे.
खोदाईवर निर्बंध
कॅन्टोन्मेंट बोर्डचे प्रभारी सीईओ डॉ. विनोद विघ्नेश्वरन यांनी एक पत्रक काढून कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात कूपनलिका खोदाईवर निर्बंध लावले आहेत. ज्या नागरिकांना कूपनलिका खोदाई करायची असेल, त्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डकडे रितसर अर्ज दाखल करावा, असेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढील काळात नागरिकांना कूपनलिकांसाठी कॅन्टोन्मेंटची परवानगी लागणार आहे.
नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
कूपनलिकेचे पाणी विक्री करण्याचा प्रकार सुरू आहे. याला निर्बंध घालण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कूपनलिकेचे पाणी विक्री करताना आढळल्यास संबंधितांवर 20 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डने पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
Home महत्वाची बातमी कूपनलिका खोदाईसाठी कॅन्टोन्मेंटची नवी नियमावली
कूपनलिका खोदाईसाठी कॅन्टोन्मेंटची नवी नियमावली
पूर्वपरवानगीशिवाय खोदता येणार नाही कूपनलिका बेळगाव : पाण्याचा अतिरिक्त उपसा टाळण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने नवीन नियमावली जाहीर केली आहे. यापुढे कूपनलिका खोदाई करण्यापूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगीनंतरच कूपनलिकांची खोदाई करता येणार आहे. तसेच यासाठी आक्षेप मागविण्यात आले असून 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. कॅम्प व किल्ला परिसरात मागील काही दिवसात कूपनलिकांद्वारे पाण्याचा […]