मार्कंडेय पुलाच्या देखभालीकडे दुर्लक्ष

सार्वजनिक बांधकाम खात्याने दखल घेण्याची मागणी बेळगाव : कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदीवर असणाऱ्या पुलाच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पुलावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण होऊन पावसाचे पाणी साचत आहे. यामुळे वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याची त्वरित दखल घेऊन पुलावरील गैरसोय दूर करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांतून केली जात आहे. मार्कंडेय नदीवरील पुलाच्या देखभालीची जबाबदारी […]

मार्कंडेय पुलाच्या देखभालीकडे दुर्लक्ष

सार्वजनिक बांधकाम खात्याने दखल घेण्याची मागणी
बेळगाव : कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदीवर असणाऱ्या पुलाच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पुलावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण होऊन पावसाचे पाणी साचत आहे. यामुळे वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याची त्वरित दखल घेऊन पुलावरील गैरसोय दूर करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांतून केली जात आहे. मार्कंडेय नदीवरील पुलाच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. मात्र पुलावर ठिकठिकाणी निर्माण झालेले खड्डे बुजविण्यात आले नसल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी साचून वाहन चालकांना याचा अडथळा निर्माण होत आहे. पुलावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी सोय करण्यात आली आहे.
मात्र याची वेळोवेळी स्वच्छता केली जात नसल्याने त्यामध्ये माती व कचरा अडकून पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पुलावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून वाहतुकीला अडथळा ठरत आहे. खड्डे चुकविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. तर यामुळे अपघात घडण्याचीही शक्यता आहे. पुलावर थांबलेल्या पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज लागणे कठीण आहे. त्यामुळे खड्डा चुकविण्यासाठी वाहनधारकांना इतर बाजूंनी वाहने हाकावी लागत आहेत. यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन पुलावर निर्माण झालेली गैरसोय दूर करावी. पाण्याच्या निचऱ्यासाठी स्वच्छता करण्याची अंत्यत गरज आहे. सदर स्वच्छता काम त्वरित हाती घेण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.