कल्लेहोळकडे सुळगा ग्राम. पं. चे साफ दुर्लक्ष

तुंबलेल्या गटारीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका : तातडीने लक्ष देण्याची मागणी वार्ताहर /उचगाव कल्लेहोळ गावाकडे सुळगा (हिं.) ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष झाल्याने गावातील गटारी, पाण्याचा निचरा, औषधाची फवारणी, अस्वच्छता तसेच विहिरीत जंतुनाशक पावडर टाकणे आदी सर्व समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तातडीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष मरूचे व इतरांनी केली आहे. सुळगा (हिं.) ग्राम. पं. कार्यक्षेत्रात […]

कल्लेहोळकडे सुळगा ग्राम. पं. चे साफ दुर्लक्ष

तुंबलेल्या गटारीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका : तातडीने लक्ष देण्याची मागणी
वार्ताहर /उचगाव
कल्लेहोळ गावाकडे सुळगा (हिं.) ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष झाल्याने गावातील गटारी, पाण्याचा निचरा, औषधाची फवारणी, अस्वच्छता तसेच विहिरीत जंतुनाशक पावडर टाकणे आदी सर्व समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तातडीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष मरूचे व इतरांनी केली आहे. सुळगा (हिं.) ग्राम. पं. कार्यक्षेत्रात येणाऱ्या कल्लेहोळ येथील गटारींची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे होते. मात्र अद्याप याकडे  लक्ष दिले नाही. विठ्ठल गल्ली, लक्ष्मी गल्लीमधील गटारी कचऱ्याने भरलेल्या असल्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने कचरा कुजून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
औषध फवारणीची गरज
सध्या गावात डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजाराची लागण होऊ नये यासाठी दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. गावात जंतुनाशक फवारणी करणे तसेच सार्वजनिक विहिरी, गावातील नागरिकांच्या विहिरीतून जंतुनाशक पावडर टाकून नागरिकांच्या आरोग्याला होणारा धोका टाळणे गरजेचे आहे. मात्र याकडे ग्रामपंचायतने लक्ष न दिल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.
नागरी सुविधा पुरवा
ग्रामपंचायतीने याची त्वरित दखल घेऊन नागरी सुविधा पुरवाव्यात आणि नागरिकांच्या आरोग्याला होणारा धोका टाळावा अशी जोरदार मागणी सर्व थरातून करण्यात येत आहे.