सुनील तटकरेंची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू संसदीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (sunil tatkare) यांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू (petroleum and natural gas) विषयक संसदीय समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे तटकरे यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.सुनील तटकरे यांना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील प्रतिष्ठित पद देण्यात आले आहे. ज्यात देशातील सर्वात वेगाने वाढणारी मागणी, पुरवठा आणि आर्थिक विकास दर आहे. ही नियुक्ती महाराष्ट्रासह रायगडसाठी अभिमानाची बाब आहे.या समितीमध्ये राज्यसभा आणि लोकसभेतील 31 सदस्यांचा समावेश असून रायगडचे खासदार सुनील तटकरे हे अध्यक्ष आहेत. सध्या देशातील सर्व क्षेत्रांमध्ये या क्षेत्राची सर्वाधिक वाढ होत आहे. या क्षेत्रातील वाढ दर वर्षाला अंदाजे 3 ते 5 टक्के आहे. देशाच्या आर्थिक विकासात या क्षेत्राचे मोठे योगदान आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आणि संबंधांच्या बाबतीत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचे महत्त्व मोठे आहे. हे आयात-निर्यात धोरण, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास दरांमध्ये आघाडीवर आहे. त्यामुळे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू हा देशाच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा पाया मानला जातो.देशाच्या आर्थिक प्रगतीचे ‘इंधन आणि इंजिन’ म्हणून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्राकडे पाहिले जाते. त्यामुळे या क्षेत्राची जबाबदारी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सोपवली जाणे ही महाराष्ट्रासाठी (maharashtra) अभिमानाची बाब आहे.हेही वाचाअबब! 2,931 झाडे लावण्यासाठी 12 कोटी खर्चठाणे स्टेशनवर 8 मजली कमर्शिअल टॉवर उभारण्यात येणार
Home महत्वाची बातमी सुनील तटकरेंची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू संसदीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
सुनील तटकरेंची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू संसदीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (sunil tatkare) यांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू (petroleum and natural gas) विषयक संसदीय समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे तटकरे यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
सुनील तटकरे यांना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील प्रतिष्ठित पद देण्यात आले आहे. ज्यात देशातील सर्वात वेगाने वाढणारी मागणी, पुरवठा आणि आर्थिक विकास दर आहे. ही नियुक्ती महाराष्ट्रासह रायगडसाठी अभिमानाची बाब आहे.
या समितीमध्ये राज्यसभा आणि लोकसभेतील 31 सदस्यांचा समावेश असून रायगडचे खासदार सुनील तटकरे हे अध्यक्ष आहेत. सध्या देशातील सर्व क्षेत्रांमध्ये या क्षेत्राची सर्वाधिक वाढ होत आहे. या क्षेत्रातील वाढ दर वर्षाला अंदाजे 3 ते 5 टक्के आहे. देशाच्या आर्थिक विकासात या क्षेत्राचे मोठे योगदान आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आणि संबंधांच्या बाबतीत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचे महत्त्व मोठे आहे. हे आयात-निर्यात धोरण, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास दरांमध्ये आघाडीवर आहे. त्यामुळे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू हा देशाच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा पाया मानला जातो.
देशाच्या आर्थिक प्रगतीचे ‘इंधन आणि इंजिन’ म्हणून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्राकडे पाहिले जाते. त्यामुळे या क्षेत्राची जबाबदारी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सोपवली जाणे ही महाराष्ट्रासाठी (maharashtra) अभिमानाची बाब आहे.हेही वाचा
अबब! 2,931 झाडे लावण्यासाठी 12 कोटी खर्च
ठाणे स्टेशनवर 8 मजली कमर्शिअल टॉवर उभारण्यात येणार