सावंतवाडी मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा
अर्चना घारे -परब राष्ट्रवादीच्या उमेदवार असतील- जिल्हाध्यक्ष अमित सामंत
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी दावा केला असला तरी महाविकास आघाडी कडून शरद पवार गट राष्ट्रवादी कॉग्रेसच निवडणूक लढवणार आहे ही आमची ठाम भूमिका आहे आणि या मतदार संघात गेली दहा वर्षे तन मन धन लावून काम करणाऱ्या अर्चना घारे परब याच आमच्या उमेदवार राहतील असा दावा राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये बोलताना केला आहे .येथे आयोजित पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कोकण विभागीय महिला सेल अश्यक्षा अर्चना घारे,जिल्हा चिटणीस रुपेश जाधव,जिल्हा अल्पसंख्याक कार्याध्यक्ष नजीर शेख,प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर,विकास मंगल,शिवाजी घोगळे, संजय सावंत,अविनाश राणे,अपर्णा पवार,वैभव परब, संदेश मयेकर आदी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी सावंतवाडी मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा
सावंतवाडी मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा
अर्चना घारे -परब राष्ट्रवादीच्या उमेदवार असतील- जिल्हाध्यक्ष अमित सामंत सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी दावा केला असला तरी महाविकास आघाडी कडून शरद पवार गट राष्ट्रवादी कॉग्रेसच निवडणूक लढवणार आहे ही आमची ठाम भूमिका आहे आणि या मतदार संघात गेली दहा वर्षे तन मन धन लावून काम करणाऱ्या […]
