राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या क्रिटीकेअर रुग्णालयातून रेग्यूलर चेकअप करून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये समीर खान हे जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. समीर खान हे कारमध्ये बसत असताना त्यांच्याच गाडीच्या चालकाकडून ॲक्सिलेटर दाबला गेल्याने समीर खान कारसोबत फरफटत गेले. या दुर्घटनेत समीर खान यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातावेळी नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर खानदेखील सोबत होत्या. दुर्घटनेनंतर समीर खान यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेप्रकरणी कारचालक अबुल अन्यारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या अपघातामध्ये काही दुचाकीही चिरडल्याचे सांगण्यात येत आहे. समीर खान यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून या अपघातामध्ये निलोफर खान यांच्याही हाताला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातप्रकरणी कारचालकाला ताब्यात घेतले असून विनोबा भावे पोलीस स्टेशन याप्रकरणाचा अधिक तपास करत आहे.हेही वाचा प्रसिद्ध चित्रकार सय्यद हैदेरा रझांचे पेंटिंग गायबठाणे : घोडबंदर रोडवर एसटी बस मेट्रोच्या खांबाला धडकली

राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या क्रिटीकेअर रुग्णालयातून रेग्यूलर चेकअप करून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये समीर खान हे जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.समीर खान हे कारमध्ये बसत असताना त्यांच्याच गाडीच्या चालकाकडून ॲक्सिलेटर दाबला गेल्याने समीर खान कारसोबत फरफटत गेले. या दुर्घटनेत समीर खान यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातावेळी नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर खानदेखील सोबत होत्या. दुर्घटनेनंतर समीर खान यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेप्रकरणी कारचालक अबुल अन्यारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, या अपघातामध्ये काही दुचाकीही चिरडल्याचे सांगण्यात येत आहे. समीर खान यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून या अपघातामध्ये निलोफर खान यांच्याही हाताला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातप्रकरणी कारचालकाला ताब्यात घेतले असून विनोबा भावे पोलीस स्टेशन याप्रकरणाचा अधिक तपास करत आहे.हेही वाचाप्रसिद्ध चित्रकार सय्यद हैदेरा रझांचे पेंटिंग गायब
ठाणे : घोडबंदर रोडवर एसटी बस मेट्रोच्या खांबाला धडकली

Go to Source