नवी मुंबईत आरटीओकडून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई

नवी मुंबईत (navi mumbai) रिक्षाचालकांच्या मनमानीचा फटका प्रवाशांना वारंवार बसत असतो. कधी भाडे नाकारणे तर कधी मीटर न टाकता सरसकट भाडे आकारणे अशी प्रकरणे नेहमीच घडत असतात. नवी मुंबई उप प्रादेशिक कार्यालयाकडून एप्रिल 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत एकूण 1881 रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.नवी मुंबई शहरातील कोपरखैरणे, घणसोली, वाशी (vashi), नेरुळ इत्यादी ठिकाणी रिक्षाचालकांचा (auto drivers) बेशिस्तपणा सुरू असतो. रिक्षा चालकांच्या मनमानी आणि आडमुठे पणामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. रेल्वे स्थानकावर असलेल्या किंवा रिक्षा शिवाय इतर पर्याय उपलब्ध नसलेल्या विभागात रिक्षा चालक हे प्रवाशांचा फायदा घेऊन मनमानीपणे भाडे आकारतात तर कधी भाडे नाकारले जाते. तर काही भागात मीटर डाऊन न करता मनमानी भाडे आकारणी केली जाते. अशा मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच जादा भाडे आकारणी करणाऱ्या 77 तर जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या 36, जलद मीटर चालवणाऱ्या 33, भाडे नाकारणाऱ्या 44 तसेच उद्धट वर्तन करणाऱ्या 34 आणि इतर 175 रिक्षा चालकांवर कारवाईचा (action) बडगा उघडला आहे. एकूण 4358 वाहने तापसली असून 1881 रिक्षा दोषी आढळल्या आहेत. या कारवाईत 34 लाख 47 हजार 500 रुपये दंडवसुली केली आहे अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी दिली.हेही वाचा पनवेल : कर्नाळा पक्षी अभयारण्याचा होणार कायापालट म्हाडा 5 वर्षात 8 लाख घरे बांधणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी मुंबईत आरटीओकडून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई

नवी मुंबईत (navi mumbai) रिक्षाचालकांच्या मनमानीचा फटका प्रवाशांना वारंवार बसत असतो. कधी भाडे नाकारणे तर कधी मीटर न टाकता सरसकट भाडे आकारणे अशी प्रकरणे नेहमीच घडत असतात. नवी मुंबई उप प्रादेशिक कार्यालयाकडून एप्रिल 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत एकूण 1881 रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.नवी मुंबई शहरातील कोपरखैरणे, घणसोली, वाशी (vashi), नेरुळ इत्यादी ठिकाणी रिक्षाचालकांचा (auto drivers) बेशिस्तपणा सुरू असतो. रिक्षा चालकांच्या मनमानी आणि आडमुठे पणामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. रेल्वे स्थानकावर असलेल्या किंवा रिक्षा शिवाय इतर पर्याय उपलब्ध नसलेल्या विभागात रिक्षा चालक हे प्रवाशांचा फायदा घेऊन मनमानीपणे भाडे आकारतात तर कधी भाडे नाकारले जाते. तर काही भागात मीटर डाऊन न करता मनमानी भाडे आकारणी केली जाते.अशा मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच जादा भाडे आकारणी करणाऱ्या 77 तर जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या 36, जलद मीटर चालवणाऱ्या 33, भाडे नाकारणाऱ्या 44 तसेच उद्धट वर्तन करणाऱ्या 34 आणि इतर 175 रिक्षा चालकांवर कारवाईचा (action) बडगा उघडला आहे. एकूण 4358 वाहने तापसली असून 1881 रिक्षा दोषी आढळल्या आहेत. या कारवाईत 34 लाख 47 हजार 500 रुपये दंडवसुली केली आहे अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी दिली.हेही वाचापनवेल : कर्नाळा पक्षी अभयारण्याचा होणार कायापालटम्हाडा 5 वर्षात 8 लाख घरे बांधणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Go to Source