खारघरमध्ये फर्टिलिटी आणि आयव्हीएफ सेंटर सुरू

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, जगभरातील वंध्यत्वाच्या एकूण प्रकरणांपैकी 25% प्रकरणे एकट्या भारतात आढळतात. गर्भधारणेसाठी संघर्ष करणाऱ्या जोडप्यांना मदत करण्यासाठी विशेष IVF केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत.  ही वाढती चिंता ओळखून, मदरहूड हॉस्पिटल्सने नवी मुंबईतील खारघर येथे त्यांचे अत्याधुनिक मदरहूड फर्टिलिटी अँड आयव्हीएफ सेंटर सुरू केले आहे. ताणतणाव, जीवनशैलीतील बदल आणि उशीरा सुरू केलेले कुटुंब नियोजन यासारख्या घटकांमुळे अधिक परिणाम होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. यासाठी आवश्यक उपचारांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे.  उद्घाटनप्रसंगी बोलताना, मदरहूड हॉस्पिटल्सचे सीईओ विजयरत्न वेंकटरमन यांनी सांगितले की, वंध्यत्व हे एक वाढते आव्हान आहे. उच्च दर्जाचे उपचार सर्वांच्या आवाक्यात असले पाहिजेत. त्यांनी आश्वासन दिले की मदरहूड फर्टिलिटी अँड आयव्हीएफ अनुभवी तज्ञ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नैतिक, पारदर्शक आणि यशस्वी फर्टिलिटी उपचार प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. हे केंद्र आयव्हीएफ (इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन), आयसीएसआय (इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन), आययूआय (इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन), फर्टिलिटी प्रिझर्वेशन (अंडी, शुक्राणू आणि भ्रूण गोठवणे) आणि आनुवंशिक आजारांवर उपचारांवर काम करेल. उपचारांव्यतिरिक्त, हे केंद्र जागरूकता आणि समुपदेशन कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करेल. जोडप्यांना वंध्यत्वाबद्दल शिक्षित करेल, उपलब्ध उपचार पर्याय यांची माहिती देखील देईल. हेही वाचा कोस्टल रोडवर डिजिटल साईनबोर्ड लावण्याचा प्रस्तावलाडकी बहिण योजनेचे बहुतेक लाभार्थी विवाहित महिला

खारघरमध्ये फर्टिलिटी आणि आयव्हीएफ सेंटर सुरू

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, जगभरातील वंध्यत्वाच्या एकूण प्रकरणांपैकी 25% प्रकरणे एकट्या भारतात आढळतात. गर्भधारणेसाठी संघर्ष करणाऱ्या जोडप्यांना मदत करण्यासाठी विशेष IVF केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. ही वाढती चिंता ओळखून, मदरहूड हॉस्पिटल्सने नवी मुंबईतील खारघर येथे त्यांचे अत्याधुनिक मदरहूड फर्टिलिटी अँड आयव्हीएफ सेंटर सुरू केले आहे. ताणतणाव, जीवनशैलीतील बदल आणि उशीरा सुरू केलेले कुटुंब नियोजन यासारख्या घटकांमुळे अधिक परिणाम होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. यासाठी आवश्यक उपचारांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. उद्घाटनप्रसंगी बोलताना, मदरहूड हॉस्पिटल्सचे सीईओ विजयरत्न वेंकटरमन यांनी सांगितले की, वंध्यत्व हे एक वाढते आव्हान आहे. उच्च दर्जाचे उपचार सर्वांच्या आवाक्यात असले पाहिजेत. त्यांनी आश्वासन दिले की मदरहूड फर्टिलिटी अँड आयव्हीएफ अनुभवी तज्ञ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नैतिक, पारदर्शक आणि यशस्वी फर्टिलिटी उपचार प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे.हे केंद्र आयव्हीएफ (इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन), आयसीएसआय (इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन), आययूआय (इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन), फर्टिलिटी प्रिझर्वेशन (अंडी, शुक्राणू आणि भ्रूण गोठवणे) आणि आनुवंशिक आजारांवर उपचारांवर काम करेल. उपचारांव्यतिरिक्त, हे केंद्र जागरूकता आणि समुपदेशन कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करेल. जोडप्यांना वंध्यत्वाबद्दल शिक्षित करेल, उपलब्ध उपचार पर्याय यांची माहिती देखील देईल. हेही वाचाकोस्टल रोडवर डिजिटल साईनबोर्ड लावण्याचा प्रस्ताव
लाडकी बहिण योजनेचे बहुतेक लाभार्थी विवाहित महिला

Go to Source