बहुप्रतिक्षित नवी मुंबई (navi mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्धाटन (NMIA) 15 मे रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज (AAHL) आणि महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) यांच्या सहकार्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पुर्ण करण्यात आले आहे. हे विमानतळ मुंबईच्या (mumbai) गर्दीच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) दबाव लक्षणीयरीत्या कमी करेल अशी अपेक्षा आहे. मंगळवारी, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमानतळाच्या तयारीचे तपशीलवार ऑन-ग्राउंड मूल्यांकन केले आहे. मूल्यांकन पथकात भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (AAI) अध्यक्ष विपिन कुमार, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS) चे प्रादेशिक संचालक प्रकाश निकम आणि AAHL आणि CIDCO चे अधिकारी यांचा समावेश होता. मूल्यांकनाचा उद्देश व्यावसायिक कामकाजासाठी विमानतळाची तयारी पडताळणे अथवा देखरेख करणे हा होता.हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, DGCA च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “NMIA च्या तयारीचा आढावा घेण्यात आला. विमानतळ अधिकाऱ्यांनी आम्हाला कळवले आहे की ते 5 मार्चपर्यंत सर्व आवश्यक परवानग्यांसाठी अर्ज करतील, त्यानुसार आम्ही पुढची प्रक्रिया करू.”एनएमआयएला यापूर्वी काही आव्हानांचा सामना करावा लागला होता. 29 डिसेंबर रोजी झालेल्या व्यावसायिक उड्डाण पडताळणी चाचणी दरम्यान इंडिगो ए320 विमान धावपट्टी 08/26 वर उतरले होते. डीजीसीएने विमानतळाच्या तयारीमध्ये काही समस्या असल्याचे सांगितले. तथापि, मंगळवारी झालेल्या तपासणीत असे दिसून आले की त्यापैकी 90 टक्के त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. विमानतळ ऑपरेटर 28 फेब्रुवारी रोजी एअरोड्रोम परवान्यासाठी अर्ज करणार आहे. हे अर्ज एकदा सादर केल्यानंतर एरोनॉटिकल इन्फॉर्मेशन पब्लिकेशन (AIP) डीजीसीएकडून 5 किंवा 7 मार्चपर्यंत मंजूर होण्याची अपेक्षा आहे. तसेच याचे प्रकाशन 30 एप्रिलपूर्वी होण्याची शक्यता आहे. नवीन विमानतळ मुंबईच्या विमान वाहतूक क्षेत्रात बदल घडवून आणण्यास सज्ज आहे. सुरुवातीला, दरवर्षी 1 ते 12 दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्याची अपेक्षा आहे. ज्यामध्ये अंदाजे 9 दशलक्ष देशांतर्गत आणि 3 दशलक्ष आंतरराष्ट्रीय प्रवासी असतील. विमानतळाचे टर्मिनल 2 वर्षाकाठी 30 दशलक्ष प्रवाशांच्या क्षमतेसाठी डिझाइन केलेले आहे, हे टर्मिनल 2028 च्या अखेरीस ते कार्यान्वित होणार आहे.हेही वाचाअॅडव्हेंचर पार्कमध्ये पिकनिकला गेलेल्या 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यूमराठी भाषा दिनी हजारांहून अधिक मराठी गीतांचे सादरीकरण
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘या’ तारखेला उद्घाटन होण्याची शक्यता