उरण खून प्रकरणः आरोपीला कर्नाटकातून अटक
उरण (uran)मध्ये 22 वर्षाच्या तरुणीचा खून प्रकरणाबाबत (murder case) आरोपीला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. कर्नाटकाच्या (karntaka) गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर हिल परिसरात आरोपी दाऊद शेख (24) लपला होता. 2019 पासून दाऊद शेख तरूणीला ओळखत होता. मुलीच्या वडिलांनी त्याच्याविरूद्ध खटलाही दाखल केला होता. त्यावेळी मुलगी अल्पवयीन असल्याने पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. सुमारे सहा महिने तुरूंगात राहिल्यानंतर, तो तुरूंगात बाहेर पडला आणि नंतर तो कर्नाटकातील आपल्या गावी गेला. तिथे तो बस चालक म्हणून काम करत होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मयत तरुणी दुसऱ्या मुलाच्या संपर्कात आली. त्यामुळे त्यांच्यातील संबंध बिघडले आणि यामुळे दाऊदला तिचा राग आला होता.”22 जुलै रोजी दाऊद शेख कॉल रेकॉर्डनुसार उरणला आला. पण 25 जुलैपासून त्याचा फोन बंद झाला होता.” असे गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 25 जुलै रोजी त्यांच्यात काय घडले ज्यामुळे त्याने मुलीवर वार केले आणि तिचा खून केला याचा पोलीस तपास करत आहेत. तसेच पुढील तपासणीसाठी आरोपीला अद्याप नवी मुंबई (navi mumbai) येथे अजून आणले गेले नाही.दरम्यान, पोलिस आयुक्त, झोन प्रथम, विवेक पन्सारे यांनी स्पष्ट केले आहे की ‘क्रूर’ हत्येबाबत सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट खोटी आहे. “मुलीचे प्रायव्हेट पार्ट कापले, तिचे डोके फोडले, स्तन कापले, हात कापले या सर्व दिशाभूल करणाऱ्या व्हायरल बातम्या खोट्या आहेत.” हेही वाचा3 वर्षांच्या विद्यार्थीनीचे शाळेतच लैंगिक शोषणअल्पवयीन मुलीचा बाळाला जन्म देताना मृत्यू
Home महत्वाची बातमी उरण खून प्रकरणः आरोपीला कर्नाटकातून अटक
उरण खून प्रकरणः आरोपीला कर्नाटकातून अटक
उरण (uran)मध्ये 22 वर्षाच्या तरुणीचा खून प्रकरणाबाबत (murder case) आरोपीला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. कर्नाटकाच्या (karntaka) गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर हिल परिसरात आरोपी दाऊद शेख (24) लपला होता.
2019 पासून दाऊद शेख तरूणीला ओळखत होता. मुलीच्या वडिलांनी त्याच्याविरूद्ध खटलाही दाखल केला होता. त्यावेळी मुलगी अल्पवयीन असल्याने पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. सुमारे सहा महिने तुरूंगात राहिल्यानंतर, तो तुरूंगात बाहेर पडला आणि नंतर तो कर्नाटकातील आपल्या गावी गेला. तिथे तो बस चालक म्हणून काम करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मयत तरुणी दुसऱ्या मुलाच्या संपर्कात आली. त्यामुळे त्यांच्यातील संबंध बिघडले आणि यामुळे दाऊदला तिचा राग आला होता.
“22 जुलै रोजी दाऊद शेख कॉल रेकॉर्डनुसार उरणला आला. पण 25 जुलैपासून त्याचा फोन बंद झाला होता.” असे गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
25 जुलै रोजी त्यांच्यात काय घडले ज्यामुळे त्याने मुलीवर वार केले आणि तिचा खून केला याचा पोलीस तपास करत आहेत. तसेच पुढील तपासणीसाठी आरोपीला अद्याप नवी मुंबई (navi mumbai) येथे अजून आणले गेले नाही.
दरम्यान, पोलिस आयुक्त, झोन प्रथम, विवेक पन्सारे यांनी स्पष्ट केले आहे की ‘क्रूर’ हत्येबाबत सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट खोटी आहे. “मुलीचे प्रायव्हेट पार्ट कापले, तिचे डोके फोडले, स्तन कापले, हात कापले या सर्व दिशाभूल करणाऱ्या व्हायरल बातम्या खोट्या आहेत.” हेही वाचा
3 वर्षांच्या विद्यार्थीनीचे शाळेतच लैंगिक शोषण
अल्पवयीन मुलीचा बाळाला जन्म देताना मृत्यू