अॅडव्हेंचर पार्कमध्ये पिकनिकला गेलेल्या 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
नवी मुंबईतील महापालिकेच्या शाळेच्या पिकनिकसाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.नवी मुंबईतील मनपा शाळा क्रमांक 76ची पिकनिक खोपोली येथील इमॅजिका येथे गेली होती. या सहलीमध्ये इयत्ता आठवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय आयुष सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आयुषला उलटी झाली आणि तो बेशुद्ध झाला होता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.”पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा असल्याने आणि वडिलांचा जबाब नोंदवला गेला नसल्यामुळे आम्ही अद्याप अपघाती मृत्यू अहवाल नोंदवलेला नाही. प्राथमिकदृष्ट्या, आरोग्याच्या समस्येमुळे हा मृत्यू झाला आहे असे दिसते,” असे खालापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी सांगितले.दरम्यान, कोल्हापूरमध्ये देखील एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोल्हापूरातील एका होस्टेलच्या बांधकामावर 3 वर्षाच्या बालकाचा इलेक्ट्रिक शॉक लागून मूत्यू झाला.आयविन रायसिंग मौर्य असे मृत मुलाचे नाव आहे. संजय रायसिंग मौर्य राहणार मध्यप्रदेश हा दोन महिण्यापूर्वी कोल्हापूरात बांधकामावर बिगारी कामगार म्हणून काम करण्यासाठी आला होता. कोल्हापूरातील एका कॉलेजच्या होस्टेलचे बांधकाम सूरू आहे. त्याठिकाणी रायसिंग मौर्य हा काम करत होता.त्याने आपला मुलगा आयविन मौर्य याला सकाळी बांधकामावर घेऊन गेला होता. या वेळी इलेक्ट्रिक शॉक लागल्याने तो बेशूद्ध पडला. त्याचे वडील आणि बांधकाम कामगारांनी त्याला कोल्हापूरच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मूत्यू झाला.हेही वाचाठाणे: 81 अनधिकृत शाळा आढळल्या, 68 एफआयआर दाखल
मुंबईत 374 अपघातांची नोंद; मृतांमध्ये पुरूषांची संख्या अधिक
Home महत्वाची बातमी अॅडव्हेंचर पार्कमध्ये पिकनिकला गेलेल्या 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
अॅडव्हेंचर पार्कमध्ये पिकनिकला गेलेल्या 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
नवी मुंबईतील महापालिकेच्या शाळेच्या पिकनिकसाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.
नवी मुंबईतील मनपा शाळा क्रमांक 76ची पिकनिक खोपोली येथील इमॅजिका येथे गेली होती. या सहलीमध्ये इयत्ता आठवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय आयुष सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आयुषला उलटी झाली आणि तो बेशुद्ध झाला होता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
“पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा असल्याने आणि वडिलांचा जबाब नोंदवला गेला नसल्यामुळे आम्ही अद्याप अपघाती मृत्यू अहवाल नोंदवलेला नाही. प्राथमिकदृष्ट्या, आरोग्याच्या समस्येमुळे हा मृत्यू झाला आहे असे दिसते,” असे खालापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी सांगितले.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये देखील एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोल्हापूरातील एका होस्टेलच्या बांधकामावर 3 वर्षाच्या बालकाचा इलेक्ट्रिक शॉक लागून मूत्यू झाला.
आयविन रायसिंग मौर्य असे मृत मुलाचे नाव आहे. संजय रायसिंग मौर्य राहणार मध्यप्रदेश हा दोन महिण्यापूर्वी कोल्हापूरात बांधकामावर बिगारी कामगार म्हणून काम करण्यासाठी आला होता. कोल्हापूरातील एका कॉलेजच्या होस्टेलचे बांधकाम सूरू आहे. त्याठिकाणी रायसिंग मौर्य हा काम करत होता.
त्याने आपला मुलगा आयविन मौर्य याला सकाळी बांधकामावर घेऊन गेला होता. या वेळी इलेक्ट्रिक शॉक लागल्याने तो बेशूद्ध पडला. त्याचे वडील आणि बांधकाम कामगारांनी त्याला कोल्हापूरच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मूत्यू झाला.हेही वाचा
ठाणे: 81 अनधिकृत शाळा आढळल्या, 68 एफआयआर दाखलमुंबईत 374 अपघातांची नोंद; मृतांमध्ये पुरूषांची संख्या अधिक