राष्ट्रीयदिवस हे उत्साह व श्र्रध्देने साजरे व्हावे

आमदार प्रेमेंद्र शेट. गोवा मुक्तीदिन डिचोलीत साजरा. डिचोली : आपल्या इतर सणाप्रमाणेच आपले राष्ट्रीय सण हे सुद्धा अत्यंत उत्साहाने आणि श्र्रद्धापूर्वक साजरे झाले पाहिजेत, स्वातंत्र्य सैनिकांप्रती आदर आणि सन्मान भाव बाळगला पाहिजे. असे मत मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी गोवा मुक्ती दिनी आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या […]

राष्ट्रीयदिवस हे उत्साह व श्र्रध्देने साजरे व्हावे

आमदार प्रेमेंद्र शेट. गोवा मुक्तीदिन डिचोलीत साजरा.
डिचोली : आपल्या इतर सणाप्रमाणेच आपले राष्ट्रीय सण हे सुद्धा अत्यंत उत्साहाने आणि श्र्रद्धापूर्वक साजरे झाले पाहिजेत, स्वातंत्र्य सैनिकांप्रती आदर आणि सन्मान भाव बाळगला पाहिजे. असे मत मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी गोवा मुक्ती दिनी आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. देशातील इतर राज्यांप्रमाणेच आपल्या निसर्गरम्य गोव्यानेही   चौफेर क्षेत्रात प्रगती केली आहे. निसर्ग सुंदर गोव्याला मुक्त करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले. त्या सर्वांप्रती आपण कृतज्ञ राहिले पाहिजे. त्यांचा सन्मान केला पाहिजे तसंच आपल्या लहानशा चिमुकल्याच्या निसर्ग सुंदर गोव्याचा आपण सर्वांनी सामूहिक प्रयत्नातून आणि जबाबदारीतून लौकिक आणखी वाढवूया असे प्रमेंद्र शेट  यांनी आवाहन केले. यावेळी डिचोली मतदारसंघाचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्या? यांची खास निमंत्रीत म्हणून उपस्थिती होती. त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, मामलेदार राजाराम परब, संयुक्त मामलेदार श्रीपाद माजीक, अभिजीत गावकर तसेच गटविकास अधिकारी ओंकार मांजरेकर आणि जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर आदी मान्यवरांची यावेळी उपस्थित होती.
यावेळी बोलताना आमदार डॉ. चंद्रकांत शेटये म्हणाले की, आपल्या निसर्ग सुंदर गोव्याला जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांची बाजी लावून असीम असे शौर्य दाखविले म्हणूनच आपण आज स्वातंत्र्याची गोड फळे चाखत आहोत. स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचा सन्मान हा राखलाच पाहिजे व त्यांच्या सन्मानासाठी असे कार्यक्रम आयोजित करून सर्वांनी त्यात सहभागी झाले पाहिजे असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्या? यांनी सांगितले. अशा कार्यक्रमांना गैरहजर राहणाऱ्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या विषयी आ. शेट्या? यांनी तीव्र शब्दांत खंत व्यक्त केली. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर दत्ताराम नाईक यांना गौरविण्यात आले. त्यांनी गोवा मुक्तीतील काही अविस्मरणीय थरारक प्रसंग कथन केले. इतर काही स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांशी गौरविण्यात आले. सरकारी प्राथमिक शाळा डिचोली व अवर लेडी ऑफ ग्रेस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करून वातावरण चैतन्यदायी बनवले. म.कृ. पाटील, महादेव परब आणि प्रकाश शिरोडकर या जेष्ठ नागरिकांनी सादर केलेल्या वास्तववादी, चैतन्यदायी आणि राष्ट्रभक्ती प्रज्वलित करणाऱ्या कविता वाचनाने उपस्थित भारावून गेले. राजाराम परब यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.

Go to Source