Nashik | मुसळधार पावसाचा फटका; अनेकजण सी-टीएटी परीक्षेला मुकले
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी (दि. ७) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. काही गाड्या मनमाड येथे रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्या वळविण्यात आल्या. परिणामी, अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आणि सी-टीएटी परीक्षेला मुकावे लागले. रेल्वे स्थानकांवर मदत कक्ष सुरू करण्यात आले होते, परंतु प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.