नाशिक : “वर्षभराची माझी मेहनत दहा मिनिटांमध्ये वाया गेली”; गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान…

दुपारी तीन वाजेच्या सुमारास निफाड परिसरात बेमोसमी पावसाने धिंगाणा घातल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रचंड वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपीट या तिहेरी माऱ्यामुळे द्राक्ष बागा पूर्णपणे उध्वस्त झालेल्या असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

नाशिक : “वर्षभराची माझी मेहनत दहा मिनिटांमध्ये वाया गेली”; गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान…

दुपारी तीन वाजेच्या सुमारास निफाड परिसरात बेमोसमी पावसाने धिंगाणा घातल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रचंड वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपीट या तिहेरी माऱ्यामुळे द्राक्ष बागा पूर्णपणे उध्वस्त झालेल्या असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. निफाड येथील शेतकरी संजय भाऊ गोळे यांनी आपल्या द्राक्ष बागेची परिस्थिती कथन करताना सांगितले की, “वर्षभराची मेहनत माझी दहा मिनिटांमध्ये वाया गेली.

आमच्या घराचे संपूर्ण उत्पन्न हे फक्त द्राक्ष बागेवर आणि गहू कांदा या पिकांवर अवलंबून होते. मात्र जेमतेम दहा मिनिट झालेल्या गारपिटीमुळे आम्ही पूर्णपणे उध्वस्त झालो आहोत. जिंदगीत कधी पाहिले नव्हता एवढा मुसळधार पाऊस आणि दगडासारख्या गारा हे दृश्य हादरवून टाकणारे होते.”

आणि हे म्हणणे फक्त एकट्या संजय गोळे यांचे नसून परिसरातील सर्व शेतकऱ्यांना द्राक्ष बागायतदारांना हा फटका सहन करावा लागलेला आहे.

संपूर्ण द्राक्ष बागा उध्वस्त झालेल्या असून हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने क्षणात हिरावून घेतलेला आहे. त्यामुळे आता त्यांना बोलणे सुद्धा अशक्य होऊन बसलेले आहे. या गारपिटीबरोबर तब्बल तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व शेतांमध्ये पाणी साचले असून जेमतेम महिना भराची कोवळी असलेली गहू कांदा व हरभरा यांची रोपे पूर्णपणे नष्ट झालेली आहेत. टोमॅटो वांगे ऊस भाजीपाला या सुद्धा सर्व पिकांना प्रचंड फटका बसलेला आहे.

Edited By – Ratnadeep Ranshoor

Go to Source