नरेंद्र मोदींनी घेतली राष्ट्रपती मुर्मू यांची भेट! सरकार स्थापनेचा केला दावा

रालोआचे संसदिय नेते नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर करून ७३ वर्षीय नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा रविवारी, ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. राष्ट्रपतींच्या भेटीनंतर त्यांनी, “आझादी का अमृत महोत्सवानंतरची […]

नरेंद्र मोदींनी घेतली राष्ट्रपती मुर्मू यांची भेट! सरकार स्थापनेचा केला दावा

रालोआचे संसदिय नेते नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर करून ७३ वर्षीय नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा रविवारी, ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतील.
राष्ट्रपतींच्या भेटीनंतर त्यांनी, “आझादी का अमृत महोत्सवानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे…तिसऱ्यांदा एनडीए सरकारला जनतेने देशसेवेची संधी दिली आहे…मी देशातील जनतेला खात्री देतो की, गेल्या दोन टर्ममध्ये देश वेगाने पुढे गेला आहे, प्रत्येक क्षेत्रात बदल दिसून येत आहे आणि 25 कोटी लोकांसाठी गरिबीतून बाहेर पडणे हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे,” असे त्यांनी म्हटलं आहे.
कालच, तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, जनता दल (युनायटेड) अध्यक्ष नितीश कुमार आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते एचडी कुमारस्वामी यांच्या पाठिंब्यानंतर नरेंद्र मोदींची औपचारिकपणे एनडीएचे नेते म्हणून निवड करण्यात आली. “आमचा 10 वर्षांचा कार्यक्रम हा फक्त ट्रेलर आहे. आम्ही आमच्या देशाच्या विकासासाठी कठोर, वेगवान कामे करू” असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.