नारायण स्पोर्टस् प्रथमेश मोरे संघ उपांत्यपूर्व फेरीत
बेळगाव : मराठा स्पोर्टस् क्लब आयोजित महंतेश कवठगीमठ चषक अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात नारायण स्पोर्टस् डीजे बाईज व एकता स्पोर्टस् संघाला तर प्रथमेश मोरे संघाने व्हीआर सिरॅमिक्स व आरसीसी अनगोळ संघांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उबेद खान, मनू शेख, नवनाथ यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. मालिनी सिटी मैदानावरती खेळविण्यात आलेल्या बुधवारच्या पहिल्या सामन्यात नारायण स्पोर्टसने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 8 गडी बाद 81 धावा केल्या. त्यात उबेद खानने 39, नवनाथने नाबाद 21, राज पटेलने 17 धावा केल्या. डीजे बाईजतर्फे मलिंद बेळगावंकर, नारायण मजूकर, अजित सुंडेकर व प्रतिक बाळेकुंद्री यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
प्रतिउत्तरादाखल खेळताना डीजे बाईजने 8 षटकात 7 गडी बाद 43 धावा केल्या. त्यात प्रतिक बाळेकुंद्रीने 18 धावा केल्या. नारायणतर्फे अमित पटेलने 2 तर साकीब, कलश व नवनाथ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात प्रथमेश मोरे संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 90 धावा केल्या. त्यात मनू शेखने 23, उस्मान पटेल व बिलाल शेख यांनी प्रत्येकी 17 तर रजत मुंढेने 15 धावा केल्या. सिरॅमिक्सतर्फे प्रशांत पाखरे, अमित बोकमूरकर, विक्रम पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रतिउत्तरादाखल खेळताना व्हीआर सिरॅमिक्सने 8 षटकात 3 गडी बाद 54 धावा केल्या. त्यात स्वप्नील चौगुलेने 26 तर रवी पाटीलने 10 धावा केल्या. प्रथमेश मोरेतर्फे साहिबान शेखने 2 गडी बाद केले. तिसऱ्या सामन्यात एकता स्पोर्टसने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 41 धावा केल्या. त्यात अरबाज दफेदारने 15 तर रवी पिल्लेने 12 धावा केल्या.
नारायण स्पोर्टसतर्फे नवनाथने 3 धावात 4 तर मीत पटेल, साकीब यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रतिउत्तरादाखल खेळताना नारायण स्पोर्टसने 2.3 षटकात 1 गडी बाद, 43 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात अमिर दफेदारने नाबाद 21, उबेज खानने 18 धावा केल्या. एकतातर्फे रोशनने 1 गडी बाद केला. चौथ्या सामन्यात आरसीसी अनगोळने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 73 धावा केल्या. त्यात सुरज पाटीलने 22 तर अमित नाईकने 20 धावा केल्या. प्रथमेश मोरेतर्फे अनिकेत सानपने 2 तर साहिबन व आशिश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रतिउत्तरादाखल खेळताना प्रथमेश मोरे संघाने 7.2 षटकात 5 गडी बाद 75 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात बिलाल शेखने 36, मुन्ना शेखने 13 धावा केल्या. आरसीसीतर्फे संदेश, रोहित, सुहेल व प्रसन्न यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे अनिल शिंदे, निखील पाटील, प्रसाद खन्नूकर, रोहित देसाई, प्रसाद जाधव, जोतिबा राजाई, बाळकृष्ण तोपिनकट्टी, राजू उबोलकर, लक्ष्मण काकतकर, सिद्धार्थ भातकांडे, नितीन बाळेकुंद्री, सदानंद मत्तीकोप्प, विनायक पाटील यांच्या हस्ते उबेद खान, मुन्ना शेख, नवनाथ व बिलाल शेख यांना सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
Home महत्वाची बातमी नारायण स्पोर्टस् प्रथमेश मोरे संघ उपांत्यपूर्व फेरीत
नारायण स्पोर्टस् प्रथमेश मोरे संघ उपांत्यपूर्व फेरीत
बेळगाव : मराठा स्पोर्टस् क्लब आयोजित महंतेश कवठगीमठ चषक अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात नारायण स्पोर्टस् डीजे बाईज व एकता स्पोर्टस् संघाला तर प्रथमेश मोरे संघाने व्हीआर सिरॅमिक्स व आरसीसी अनगोळ संघांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उबेद खान, मनू शेख, नवनाथ यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. मालिनी सिटी […]