नाओमी ओसाकाचे पुनरागमन विजयाने
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या ब्रिस्बेन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जपानची महिला टेनिसपटू नाओमी ओसाकाने टेनिस क्षेत्रातील आपले पुनरागमन विजयाने साजरे केले. आतापर्यंत चार वेळेला ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविणाऱ्या ओसाकाने या स्पर्धेतील पहिल्या फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या टॅमेरा कोरपॅचवर 6-3, 7-6 (9-7) अशी मात करत विजयी सलामी दिली.
नाओमी ओसाकाने तब्बल 15 महिन्यांच्या कालावधीनंतर टेनिस क्षेत्रात आपले पुनरागमन केले आहे. 26 वर्षीय ओसाकाने 2022 च्या सप्टेंबरमध्ये पहिल्या आपत्याला जन्म देण्यासाठी टेनिस क्षेत्रापासून अलिप्त राहिली होती. गेल्या जुलै महिन्यात तिला कन्यारत्न प्राप्त झाले. या कन्येचे नामकरण शाई असे करण्यात आले. 14 ते 28 जानेवारी दरम्यान मेलबॉर्न येथे होणाऱ्या 2024 च्या टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ओसाकाने आतापासूनच टेनिसचा जोरदार सराव सुरु केला आहे.
Home महत्वाची बातमी नाओमी ओसाकाचे पुनरागमन विजयाने
नाओमी ओसाकाचे पुनरागमन विजयाने
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या ब्रिस्बेन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जपानची महिला टेनिसपटू नाओमी ओसाकाने टेनिस क्षेत्रातील आपले पुनरागमन विजयाने साजरे केले. आतापर्यंत चार वेळेला ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविणाऱ्या ओसाकाने या स्पर्धेतील पहिल्या फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या टॅमेरा कोरपॅचवर 6-3, 7-6 (9-7) अशी मात करत विजयी सलामी दिली. नाओमी ओसाकाने तब्बल 15 महिन्यांच्या कालावधीनंतर […]