कर्नाटकातून 7 जणांची नावे जाहीर
शिमोग्यातून गीता शिवराजकुमार, बेंगळूर ग्रामीणमध्ये पुन्हा डी. के. सुरेश
प्रतिनिधी/ बेंगळूर
तीव्र कुतूहल निर्माण झालेल्या काँग्रेस उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात झाली आहे. पहिल्या यादीत कर्नाटकातील 7 जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. राज्यातील 28 मतदारसंघांपैकी तुमकूर, विजापूर, हावेरी, शिमोगा, बेंगळूर ग्रामीण, मंड्या आणि हासन या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
कर्नाटकातील काँग्रेसचे एकमेव खासदार आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश यांना पुन्हा बेंगळूर ग्रामीण मतदारसंघातून तिकीट दिले आहे. तर विधानसभा निवडणुकीवेळी भाजपप्रवेश केलेल्या आणि लोकसभा निवडणूक जवळ आल्याने काही दिवसांपूर्वीच पुन्हा काँग्रेसप्रवेश केलेल्या माजी खासदार मुद्दहनुमेगौडा यांना तुमकूरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांची मुलगी आणि कन्नड सिनेअभिनेते शिवराजकुमार यांच्या पत्नी गीता राजकुमार यांना शिमोगा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या निजदमधून रिंगणात होत्या.
निजदचा बालेकिल्ला असलेल्या हासनमधून एम. श्रेयस पटेल, विजापूरमधून एस. आर. अलगूर, हावेरीतून आनंदस्वामी ग•देवरमठ तसेच तीव्र चढाओढ असणाऱ्या मंड्या मतदारसंघातून काँग्रेसने स्टार चंद्रू (वेंकटरामेगौडा) यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे मंड्या मतदारसंघातून विद्यमान अपक्ष खासदार सुमलता अंबरिश यांना काँग्रेसमधून तिकीट मिळण्याची आशा मावळली आहे. भाजपकडून तिकीट न मिळाल्यास काँग्रेसचे दरवाजे ठोठावण्याचा विचार चालविला होता.
दोन नावे रोखून धरली?
काँग्रेसने संभाव्य उमेदवार यादीतून अंतिम निवड केलेल्या काही जणांची नावे अखेरच्या क्षणी रोखून धरल्याचे सांगितले जात आहे. उडुपी-चिक्कमंगळूरमधून जयप्रकाश हेगडे आणि चित्रदूर्गमधून बी. एन. चंद्रप्पा यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले होते. परंतु, काही कारणांमुळे ही नावे पहिल्या यादीत जाहीर करण्यात आली नाहीत.
कर्नाटकातील काँग्रेसचे उमेदवार
मतदारसंघ उमेदवार जात
विजापूर राजू अलगुर एस.सी.
तुमकूर मुद्दहनुमेगौडा वक्कलिग
शिमोगा गीता शिवराजकुमार ईडिग
हासन एम. श्रेयस पटेल वक्कलिग
मंड्या वेंकटरामेगौडा (स्टार चंद्रू) वक्कलिग
बेंगळूर ग्रामीण डी. के. सुरेश वक्कलिग
हावेरी आनंदस्वामी ग•देवरमठ लिंगायत
Home महत्वाची बातमी कर्नाटकातून 7 जणांची नावे जाहीर
कर्नाटकातून 7 जणांची नावे जाहीर
शिमोग्यातून गीता शिवराजकुमार, बेंगळूर ग्रामीणमध्ये पुन्हा डी. के. सुरेश प्रतिनिधी/ बेंगळूर तीव्र कुतूहल निर्माण झालेल्या काँग्रेस उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात झाली आहे. पहिल्या यादीत कर्नाटकातील 7 जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. राज्यातील 28 मतदारसंघांपैकी तुमकूर, विजापूर, हावेरी, शिमोगा, बेंगळूर ग्रामीण, मंड्या आणि हासन या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. कर्नाटकातील […]