नजमूल हसन यांचा अध्यक्षपदाचा त्याग
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेश क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष नजमूल हसन यांनी आपल्या पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अवामी लिगने पुन्हा बहुमत मिळविले. शेख हसीना यांच्या मंत्रिमंडळामध्ये नजमूल हसन यांच्यावर क्रीडा युवजन खात्याच्या मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याने त्यांनी बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
2012 पासून नजमूल हसन हे बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. आता लवकरच बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या नव्या अध्यक्षाची घोषणा केली जाईल, अशी अपेक्षा आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या आगामी निवडणुका ऑक्टोबर 2025 मध्ये होणार आहेत.
Home महत्वाची बातमी नजमूल हसन यांचा अध्यक्षपदाचा त्याग
नजमूल हसन यांचा अध्यक्षपदाचा त्याग
वृत्तसंस्था/ ढाका बांगलादेश क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष नजमूल हसन यांनी आपल्या पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अवामी लिगने पुन्हा बहुमत मिळविले. शेख हसीना यांच्या मंत्रिमंडळामध्ये नजमूल हसन यांच्यावर क्रीडा युवजन खात्याच्या मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याने त्यांनी बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 2012 पासून नजमूल हसन हे […]
