विनातिकीट प्रवाशांवरनैर्त्रुत्य रेल्वेची धडक कारवाई
हुबळी विभागात साडेसहा कोटींची दंडवसुली
बेळगाव : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा धडाका नैर्त्रुत्य रेल्वेने सुरू केला आहे. 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2023 या दरम्यान केवळ हुबळी विभागात 6 कोटी 36 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये बेळगावमधील रेल्वेस्थानकावर कारवाई केलेल्या प्रवाशांचाही समावेश आहे. त्यामुळे विनातिकीट प्रवास करण्यापूर्वी चारवेळा विचार करणे गरजेचे आहे. नैर्त्रुत्य रेल्वेने नुकताच एक अहवाल सादर केला असून यामध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. एकूण नैर्त्रुत्य रेल्वे विभागामध्ये 6 लाख 27 हजार 14 प्रवाशांवर कारवाई केली. या कारवाईतून 46 कोटी 31 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. हुबळी, बेंगळूर व म्हैसूर या विभागांमध्ये या कारवाया केल्या आहेत. याबरोबरच भरारी पथकाकडूनही कारवाई केली आहे. बरेच प्रवासी तिकीट न काढताच प्रवास करत असल्याचे निदर्शनास येत असल्याने नैर्त्रुत्य रेल्वेने धडक कारवाई सुरू केली. हुबळी विभागामध्ये 96 हजार 790 प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे आढळले. त्यांच्याकडून 6 कोटी 36 लाखांचा दंड वसूल केला आहे. बेंगळूर विभागात 28 कोटी 26 लाख, म्हैसूर विभागात 5 कोटी 91 लाख तर भरारी पथकाने 5 कोटी 77 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
Home महत्वाची बातमी विनातिकीट प्रवाशांवरनैर्त्रुत्य रेल्वेची धडक कारवाई
विनातिकीट प्रवाशांवरनैर्त्रुत्य रेल्वेची धडक कारवाई
हुबळी विभागात साडेसहा कोटींची दंडवसुली बेळगाव : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा धडाका नैर्त्रुत्य रेल्वेने सुरू केला आहे. 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2023 या दरम्यान केवळ हुबळी विभागात 6 कोटी 36 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये बेळगावमधील रेल्वेस्थानकावर कारवाई केलेल्या प्रवाशांचाही समावेश आहे. त्यामुळे विनातिकीट प्रवास करण्यापूर्वी चारवेळा विचार करणे गरजेचे आहे. […]