नागराजचा बनियावर प्रेक्षणीय विजय

बेळगाव : चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समिती आयोजित सुवर्ण महोत्सवी चुडाप्पा हलगेकर कुस्ती मैदानात कर्नाटक केसरी नागराज बशिडोनीने बनिया पंजाबचा 7 व्या मिनिटाला दुहेरी पटावर उचलून आसमान दाखवित उपस्थित कुस्ती शौकिनांची  मने जिंकली. आनंदवाडी आखाड्यात आयोजित  प्रमुख कुस्तीस माजी आमदार परशुराम नंदीहाळ्ळी, कुस्तीचे आश्रयदाता सतीश पाटील, उद्योगपती मलिकार्जुन जगजंपी, गुलाबजंगु शेख, विलास घाडी, मारुती घाडी, […]

नागराजचा बनियावर प्रेक्षणीय विजय

बेळगाव : चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समिती आयोजित सुवर्ण महोत्सवी चुडाप्पा हलगेकर कुस्ती मैदानात कर्नाटक केसरी नागराज बशिडोनीने बनिया पंजाबचा 7 व्या मिनिटाला दुहेरी पटावर उचलून आसमान दाखवित उपस्थित कुस्ती शौकिनांची  मने जिंकली. आनंदवाडी आखाड्यात आयोजित  प्रमुख कुस्तीस माजी आमदार परशुराम नंदीहाळ्ळी, कुस्तीचे आश्रयदाता सतीश पाटील, उद्योगपती मलिकार्जुन जगजंपी, गुलाबजंगु शेख, विलास घाडी, मारुती घाडी, अशोक हलगेकर आदी मान्यवरांच्या हस्ते कर्नाटक केसरी नागराज बशिडोनी व बनिया पंजाब यांच्यात कुस्ती लावण्यात आली. दुसऱ्याच मिनिटाला नागराज बशिडोनीने दुहेरी पट काढून बनियाला खाली घेत चीत करण्याचा प्रयत्न केला. पण चपळाईने बनियाने सुटका करून घेतली. चौथ्या मिनिटाला पुन्हा नागराजने बनियाला दुहेरीपट काढून निकालावर चीत करण्याचा प्रयत्न केला. पण बनियाने सुटका करून घेतली. सातव्या मिनिटाला पुन्हा नागराजने दुहेरीपट काढून बनियाला निकाल आणि दुहेरी पटावर चीत करून उपस्थित कुस्ती शौनिकांची मने जिंकली.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती करण पंजाब व प्रकाश इंगळगी यांच्यात आनंद जाधव, शंकर मुचंडी, अशोक हलगेकर, गजानन घोरपडे, मधुकर वेर्लेकर, ईश्वर पाटील, नितीन चौगुले, शंकर चौगुले, सुनील, प्रभाकर हलगेकर यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्या मिनिटाला प्रकाश इंगळगीने एकेरीपट काढीत करण पंजाबला खाली घेऊन घीस्सावर चीत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून करणने सावरून सुटका करून घेतली. आठव्या मिनिटाला करणने एकेरीपट काढत प्रकाशला खाली घेत एकलांगी भरण्याचा प्रयत्न केला. पण प्रकाशने त्यातून सुटका करून घेतली. बाराव्या मिनिटाला प्रकाश इंगळगीने एकेरीपट काढून करणला खाली घेत चीत करण्याचा प्रयत्न केला. ही कुस्ती डाव प्रतिडावांनी झुंजली. वेळेअभावी कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत किर्तीकुमार बेनकेने ऋषिकेश भोसेकरला घीस्सा डावावर पराभव केला. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत महेश लंगोटीने ऋषिकेश सावंतवर पोकळ घीस्सावरती विजय मिळवला. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत पार्थ पाटील कंग्राळी व विजय सौदी यांच्यातील कुस्ती डाव प्रतिडावाने झुंजली. पण दुखापत झाल्याने पार्थ पाटीलला विजय घोषित करण्यात आले. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत पवन चिकदिनकोपने पृथ्वी पाटीलचा एकलांगी डावावर पराभूत केले. त्याचप्रमाणे महेश तीर्थकुंडे, परशराम हरिहर, श्री घाडी, अनिरुद्ध पाटील, प्रणव गडकरी, ज्योतिबा चापगाव, पप्पू पाटील, केशव मुतगे, ओमकार गोडगिरी, सुशांत पाटील, आर्यन मुतगे, दर्शन मैत्री, अभिलाष, रितेश पाटील, आर्यन मच्छे, प्रणव खादरवाडी, समर्थ लाटुकर, आदी हळदणकर यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. महिलांच्या प्रमुख कुस्तीत कल्याणी वाघवडेने राधिकावर विजय मिळवला. भक्ती पाटीलने शितलवर विजय मिळवला. पद्मा खादरवाडी, सिद्धी निलजकर, तनुजा खानापूर, आदिती कोरे, दीपा अनगोळ, प्रांजल बिर्जे, पूर्वी लोकुळाचे यांनी विजय मिळवला. प्रारंभी आखाड्याचे पूजन गुलाब शेख, आनंद जाधव, ईश्वर पाटील, डॉ. समीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. हनुमान प्रतिमेचे पूजन रावजी पाटील यांनी केले. आखाड्याचे पंच म्हणून कृष्णा पाटील, बाळाराम पाटील, विलास घाडी, सुधीर बिर्जे, नवीन मुदगे, दुर्गेश संतीबस्तवाड, मारुती तुळजाई, भावकाण्णा  पाटील, विलास घाडी, पिराजी मुचंडीकर, शिवाजी कडोली, बाबू कल्लेहोळ यांनी काम पाहिले. शिवकुमार माळीने समालोचन केले.