नदाल, रुड दुहेरीच्या उपांत्यफेरीत
बॅस्टेड : एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या बॅस्टेड खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा माजी टॉपसिडेड राफेल नदाल आणि रुमानियाचा कास्पर रुड यांनी दुहेरीची उपांत्यफेरी गाठली आहे. दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रुड आणि नदाल यांनी फ्रान्सच्या अॅरीबेग आणि रशियाचा सैफुलीन यांचा 6-4, 3-6, 12-10 अशा सेटस्मध्ये पराभव करत शेवटच्या चार जोड्यांमध्ये स्थान मिळविले. हा सामना जवळपास 2 तास चालला होता. या स्पर्धेत पुरूष एकेरीत ब्रिटनच्या कॅमेरुन नुरीबरोबर नदालचा सामना होणार आहे. तर एकेरीच्या अन्य एका सामन्यात मॉन्टेरोने रुडचा 6-3, 6-3 असा पराभव केला. गेल्या वर्षी स्विडनमध्ये झालेल्या स्पर्धेत रुडने अंतिम फेरी गाठली होती.
Home महत्वाची बातमी नदाल, रुड दुहेरीच्या उपांत्यफेरीत
नदाल, रुड दुहेरीच्या उपांत्यफेरीत
बॅस्टेड : एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या बॅस्टेड खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा माजी टॉपसिडेड राफेल नदाल आणि रुमानियाचा कास्पर रुड यांनी दुहेरीची उपांत्यफेरी गाठली आहे. दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रुड आणि नदाल यांनी फ्रान्सच्या अॅरीबेग आणि रशियाचा सैफुलीन यांचा 6-4, 3-6, 12-10 अशा सेटस्मध्ये पराभव करत शेवटच्या चार जोड्यांमध्ये स्थान मिळविले. हा सामना […]
