पौराणिक कथा : होलिका आणि भक्त प्रल्हादाची गोष्ट
Kids story : एकदा हिरण्यकश्यपू राजाने घोर तप करून देवाला प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून वर मागितला की त्याला माणसाकडून किंवा प्राण्याकडून, दिवसा किंवा रात्री, घरात किंवा घराबाहेर मरण येणार नाही. तसेच ब्रह्मांनी तथास्तु म्हटत त्याला वर दिले आणि यामुळे त्याला वाटू लागले की तो आता अमर झाला त्याचा कुणीही वध करू शकणार नाही.
आता मात्र हिरण्यकश्यपूला अहंकार झाला. तो देवांपेक्षा मोठा असल्याचा त्याला अभिमान होऊ लागला. कुणीही देवाचे नाव घेतलेले तर तर त्याला सहन होईना.
हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद हा देवभक्त होता तो भगवान विष्णूंचा मोठा भक्त होता व सतत त्यांचे नामस्मरण करीत असे. प्रल्हाद सतत नारायण नारायण असा जप करतच असे. वडिलांना त्यांचे जप करणे सहन होत नव्हते. त्याला अनेकदा समजावून सांगितल्यावर देखील त्याचा जप सुरुच असायचा. तसेच घाबरवण्याचा देखील प्रयत्न केला परंतू प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. कारण भक्त प्रल्हादावर त्याचा काही परिणाम होत नव्हता.प्रल्हादाचा नामजप ऐकून हिरण्यकश्यपूला राग अनावर होत होता. आता अखेर हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी त्याने आपल्या बहिणी होलिकाची मदत घेतली. होलिकाला वरदान मिळालं होतं की तिला आग भस्म करु शकत नाही. म्हणून तिला अग्नीचे भय नव्हते.
हिरण्यकश्यपूने होलिकेला भकत प्रल्हादाला मांडीवर घे?न आगीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रल्हाद तेव्हा देखील भगवान विष्णूंच्या नामस्मरणात तल्लीन होता.
ALSO READ: पौराणिक कथा : कृष्णाचे लोणीवरील प्रेम
प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. त्या चितेमध्ये होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला अग्नी देखील काही करु शकली नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला. अशाप्रकारे त्यादिवशी लोकांनी उत्सव साजरा केला. आणि तो दिवस ‘होलिका दहन’ म्हणून ओळखू लागले.
ALSO READ: पौराणिक कथा : देवावर श्रद्धा
Edited By- Dhanashri Naik
