मुंबईतील सेमीकंडक्टर प्रकल्प मविआचे सरकारच पूर्ण करेल : रोहित पवार

महाराष्ट्रातील (maharashtra) पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या (semiconductor project) पहिल्या टप्प्याचा बुधवारी मुंबई (mumbai) येथे शुभारंभ झाला.  या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि अजित पवार (ajit pawar), उद्योगमंत्री उदय सामंत (uday samant), ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकरांसह सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) हे उपस्थित होते.  यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना आमदार (mla) रोहित पवार (rohit pawar) यांनी सांगितले की, हा प्रकल्प महायुती (mahayuti) सुरू करत असली तरी निश्चितपणे राज्यातील पुढील सरकार महाविकास आघाडीचे (mahavikasaghadi) आहे आणि महाविकास आघाडीचे हे सरकारच हा प्रकल्प पूर्ण करेल.रोहित पवार यावेळी या प्रकल्प उभारणीबद्दल बोलताना म्हणाले की, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून का होईना या प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे, ही निश्चितच चांगली बाब आहे. मागील अडीच वर्षे अनेक प्रकल्प गुजरातला गेले, त्याऐवजी त्या प्रकल्पांचे महाराष्ट्रात उद्घाटन केले असते तर आम्हाला जास्त आनंद झाला असता व लाखो तरुणांच्या हाताला काम मिळाले असते, असा टोला देखील त्यांनी सरकारला लगावला.हेही वाचा मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला 130 कोटींची देणगी मुंबईच्या आयकॉनिक एशियाटिक सोसायटीला राष्ट्रीय दर्जाची मागणी

मुंबईतील सेमीकंडक्टर प्रकल्प मविआचे सरकारच पूर्ण करेल : रोहित पवार

महाराष्ट्रातील (maharashtra) पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या (semiconductor project) पहिल्या टप्प्याचा बुधवारी मुंबई (mumbai) येथे शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि अजित पवार (ajit pawar), उद्योगमंत्री उदय सामंत (uday samant), ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकरांसह सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) हे उपस्थित होते. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना आमदार (mla) रोहित पवार (rohit pawar) यांनी सांगितले की, हा प्रकल्प महायुती (mahayuti) सुरू करत असली तरी निश्चितपणे राज्यातील पुढील सरकार महाविकास आघाडीचे (mahavikasaghadi) आहे आणि महाविकास आघाडीचे हे सरकारच हा प्रकल्प पूर्ण करेल.रोहित पवार यावेळी या प्रकल्प उभारणीबद्दल बोलताना म्हणाले की, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून का होईना या प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे, ही निश्चितच चांगली बाब आहे. मागील अडीच वर्षे अनेक प्रकल्प गुजरातला गेले, त्याऐवजी त्या प्रकल्पांचे महाराष्ट्रात उद्घाटन केले असते तर आम्हाला जास्त आनंद झाला असता व लाखो तरुणांच्या हाताला काम मिळाले असते, असा टोला देखील त्यांनी सरकारला लगावला.हेही वाचामोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला 130 कोटींची देणगीमुंबईच्या आयकॉनिक एशियाटिक सोसायटीला राष्ट्रीय दर्जाची मागणी

Go to Source