कंबळी खुटावरील मुतारी बांधकामाला सुरुवात

बेळगाव : गणपत गल्ली कॉर्नर, कंबळी खुट येथील सरकारी मराठी मुलींची शाळा क्र. 1 मध्ये मुतारीच्या बांधकामाला शिक्षण विभागाने तसेच नागरिकांनीही विरोध दर्शविला होता. परंतु, स्थानिक लोकप्रतिनिधी शौचालय बांधकामासाठी आग्रही होते. मात्र वाढता विरोध पाहता पूर्वी जेथे मुतारी होती, तेथेच बांधकाम सुरू करण्यात आले आहे. शंभर वर्षांहून अधिकचा इतिहास असणाऱ्या शाळेच्या पाठीमागे महानगरपालिकेतर्फे काही वर्षांपूर्वी […]

कंबळी खुटावरील मुतारी बांधकामाला सुरुवात

बेळगाव : गणपत गल्ली कॉर्नर, कंबळी खुट येथील सरकारी मराठी मुलींची शाळा क्र. 1 मध्ये मुतारीच्या बांधकामाला शिक्षण विभागाने तसेच नागरिकांनीही विरोध दर्शविला होता. परंतु, स्थानिक लोकप्रतिनिधी शौचालय बांधकामासाठी आग्रही होते. मात्र वाढता विरोध पाहता पूर्वी जेथे मुतारी होती, तेथेच बांधकाम सुरू करण्यात आले आहे. शंभर वर्षांहून अधिकचा इतिहास असणाऱ्या शाळेच्या पाठीमागे महानगरपालिकेतर्फे काही वर्षांपूर्वी मुतारी बांधण्यात आली होती. मागील पावसाळ्यात शाळेचे छत गळत असल्यामुळे शाळा तात्पुरती इतर शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आली होती. परंतु, काही दिवसांपूर्वी या शाळेच्या पाठीमागे शौचालयाचे बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यावेळी गटशिक्षणाधिकारी व काही नागरिकांनी विरोध केल्याने काम थांबविण्यात आले होते.