खडकी परिसरात तरुणाचा खून, आरोपीला अटक

पुण्यातील खडकी परिसरात एका तरुणाचा खून करून मृतदेह जाळून टाकळण्याची धक्कादायक घटना रविवारी 17 मार्च रोजी दुपारी घडली आहे

खडकी परिसरात तरुणाचा खून, आरोपीला अटक

पुण्यातील खडकी परिसरात एका तरुणाचा खून करून मृतदेह जाळून टाकळण्याची धक्कादायक घटना रविवारी 17 मार्च रोजी दुपारी घडली आहे. विजय राजू धोत्रे (33)असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सुधीर साहेबराव जाधव असे या आरोपीचे नाव आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन खडकी पुलाखाली मुळानदीच्या पात्रात जलपर्णीमध्ये एका तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थतेत आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनास्थळाची तपासणी करता पोलिसांना एक चिट्ठी आढळली आणि कपड्यांच्या तुकड्याच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला.

 

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मृत येरवडा भागातील रहिवासी असल्याचे समजले. मृतदेहाच्या पायावरील जुन्या जखमेवरुन मृतकाची ओळख नातेवाईकांकडून पटली. पूर्ववैमनस्यातून हे खून केल्याची शक्यता वर्तवण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी सुधीर जाधवला अटक केली. या प्रकरणात आरोपीच्या  इतर साथीदारांचा शोध पोलीस करत आहे. 

 

 Edited by – Priya Dixit 

 

Go to Source