मनपा प्रकल्प आता लागणार मार्गी

साधनसुविधा कर, विकास शुल्कापोटी एनजीपीडीएला 1.25 कोटी अदा पणजी : पणजी मनपासाठी बांधण्यात येणाऱ्या प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला असून पायाभूत सुविधा कर तसेच विकास शुल्कापोटी देणे असलेले सुमारे 1.25 कोटी ऊपये  उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाला (एनजीपीडीए) अदा केले आहेत. त्यामुळे आता येत्या 25 जानेवारीपासून इमारत बांधकामास प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. […]

मनपा प्रकल्प आता लागणार मार्गी

साधनसुविधा कर, विकास शुल्कापोटी एनजीपीडीएला 1.25 कोटी अदा
पणजी : पणजी मनपासाठी बांधण्यात येणाऱ्या प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला असून पायाभूत सुविधा कर तसेच विकास शुल्कापोटी देणे असलेले सुमारे 1.25 कोटी ऊपये  उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाला (एनजीपीडीए) अदा केले आहेत. त्यामुळे आता येत्या 25 जानेवारीपासून इमारत बांधकामास प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार आपल्या पोर्तुगीजकालीन इमारतीच्या जागी अत्याधुनिक प्रकल्प उभारण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून मनपा प्रयत्नरत होती. त्यादृष्टीने गतवर्षी पायाभरणीही करण्यात आली होती. परंतु सदर इमारतीसाठीचे पायाभूत सुविधा कर आणि इतर शुल्काची रक्कम एनजीपीडीएकडे मनपाने भरावी की साधनसुविधा विकास महामंडळाने भरावी? या गोंधळात ती फेडणे राहून गेले होते. परिणामी प्रकल्प बांधकामास मोठा विलंब झाला होता. मनपाने अखेर एनजीपीडीएकडे शुल्क भरले असून आता प्रकल्प बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. मनपातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पायाभूत सुविधा म्हणून 91.6 लाख ऊपये आणि ‘विकास शुल्क” म्हणून 33.4 लाख ऊपये अदा केले आहेत. दरम्यान, आता बांधकामास प्रारंभ होत असल्यामुळे सदर इमारतीतील मनपा कार्यालय अन्यत्र हलविण्यात येणार आहे. त्यासाठी मनपाला महात्मा गांधी मार्गावरील व्यावसायिक कर खात्याच्या जुन्या इमारतीत जागा देण्यात आली असून मनपाचे कामकाज लवकरच त्या इमारतीतून सुरू होणार आहे. शक्यतो 25 जानेवारीपासून बांधकाम प्रारंभ होणार आहे, अशी माहिती सदर अधिकाऱ्याने दिली.