15 जानेवारीला महापालिका निवडणुका, आचारसंहिता लागू
राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या तारखा आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
ALSO READ: राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीच्या तारखांची घोषणा
मतदान प्रक्रिया 15 जानेवारी रोजी पार पडणार असून, त्यानंतर लगेचच 16जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी व्यापक तयारी करण्यात आली असून 39 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
ALSO READ: महाराष्ट्र सरकारने सात नवीन पोलीस स्टेशन आणि अतिरिक्त वरिष्ठ पदांना मान्यता दिली
निवडणूक प्रचार 48 तासांपूर्वी थांबवावा लागणार आहे. तर उमेदवारांसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल प्रक्रिया 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत सुरु असणार आहे.
ALSO READ: अजित पवारांच्या ‘21 माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश?
31 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 2 जानेवारी आहे. तर निवडणूक चिन्हांचे वापर 3 जानेवारी रोजी केले जाणार आहे. 29 महापालिका क्षेत्रांमध्ये आजपासून आचार संहिता लागू करण्यात आली आहे.
Edited By – Priya Dixit
