मनपा आयुक्तांनी मारला शहराचा फेरफटका

गो-शाळा तसेच विविध प्रकल्पांना भेट देऊन केली पाहणी : अधिकाऱ्यांना केल्या सूचना बेळगाव : महानगरपालिका आयुक्तांनी बुधवारी पहाटेच शहराचा फेरफटका मारला. महानगरपालिकेच्या गो-शाळेला तसेच किल्ला तलाव आणि विविध प्रकल्पांना भेट देऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी साऱ्यांनीच समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे असून त्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने पाऊल उचला, अशी सूचना त्यांनी […]

मनपा आयुक्तांनी मारला शहराचा फेरफटका

गो-शाळा तसेच विविध प्रकल्पांना भेट देऊन केली पाहणी : अधिकाऱ्यांना केल्या सूचना
बेळगाव : महानगरपालिका आयुक्तांनी बुधवारी पहाटेच शहराचा फेरफटका मारला. महानगरपालिकेच्या गो-शाळेला तसेच किल्ला तलाव आणि विविध प्रकल्पांना भेट देऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी साऱ्यांनीच समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे असून त्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने पाऊल उचला, अशी सूचना त्यांनी केली. श्रीनगर येथील एबीसी सेंटर, गो-शाळा, किल्ला तलाव, विविध ठिकाणी असलेल्या नाल्यांना भेटी दिल्या आहेत. याचबरोबर घरोघरी कचरा जमा केला जातो, याची पाहणी अशोकनगर परिसरात त्यांनी केली. नाल्यांची साफसफाई करण्यासाठी तातडीने कामाला लागा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. किल्ला तलाव येथेही विविध कामे प्रलंबित असून ती कामे पूर्ण करावीत, अशी सूचना केली आहे. अशोकनगर येथील घरोघरी जावून कचऱ्याची उचल वेळेत केली जाते की नाही, याची माहिती नागरिकांकडून घेतली आहे. कोणत्याही कामामध्ये वेळकाढूपणा करू नका. तर तातडीने ती कामे पूर्ण करा. गो-शाळेमध्ये भेट देऊन तेथील जनावरांची पाहणी केली. याचबरोबर त्या जनावरांना चारा उपलब्ध आहे की नाही, याची माहिती देखील आयुक्त पी. एन. लोकेश यांनी घेतली. विविध ठिकाणी रस्त्यावर पडलेला कचरा गोळा करण्याची सूचना सफाई कर्मचाऱ्यांना केली. कोणत्याही परिस्थितीत कचऱ्याचे ढीग साचू नये, याची दक्षता घ्या, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे व इतर अधिकारी उपस्थित होते.