मुंबईतील एम वेस्ट वॉर्डमध्ये होणार जनगणना चाचणी

भारताच्या 2027 च्या जनगणनेच्या तयारीला सुरुवात झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) जाहीर केले आहे की येत्या महिन्यात, म्हणजेच 10 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत, मुंबईतील एम वेस्ट प्रशासकीय विभागात (चेंबूर) जनगणना प्राथमिक चाचणी उपक्रम (Preliminary Test) राबवण्यात येणार आहे.  हा उपक्रम देशभरातील जनगणना प्रक्रियेला अधिक प्रभावी आणि अचूक बनवण्यासाठीच्या तयारीचा एक भाग आहे. शेवटची जनगणना 2011 साली झाली होती. जनगणना संचलनालयाच्या माहितीनुसार, या चाचणीमध्ये घर नोंदणी आणि गृहनिर्माण गणना (House Listing and Housing Enumeration) या सर्व महत्त्वाच्या बाबींचा समावेश असेल. रहिवाशांना स्वयं-नोंदणी (Self-enumeration) सुविधेद्वारे स्वतःची माहिती ऑनलाइन सादर करण्याचीही संधी असेल. ही सुविधा 1 ते 7 नोव्हेंबर 2025 दरम्यान उपलब्ध राहील. अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, घरोघरी भेट देणाऱ्या गणक (Enumerators) आणि पर्यवेक्षकांना सहकार्य करावे. महाराष्ट्र हा या तयारीसाठी निवडलेल्या राज्यांपैकी एक असून, येथे तीन क्षेत्रांमध्ये ही चाचणी होणार आहे.मुंबईतील एम वेस्ट वॉर्ड (चेंबूर)चोपडा तालुका (जळगाव जिल्हा)गगनबावडा तालुका (कोल्हापूर जिल्हा)मुंबईत या उपक्रमासाठी एम वेस्ट वॉर्डमधील 135 घर नोंदणी ब्लॉक्स निश्चित करण्यात आले आहेत. राज्यभरात या सर्वेक्षणासाठी 402 गणक आणि पर्यवेक्षकांची टीम कार्यरत राहील. मंगळवारी बीएमसीचे आयुक्त भूषण गगराणी यांनी जनगणना संचालनालयाच्या संचालक डॉ. निरुपमा जे. डांगे यांची भेट घेऊन या उपक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला पश्चिम उपनगर क्षेत्राचे अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा हे देखील उपस्थित होते. भारत सरकारने आधीच जाहीर केले आहे की 2027 ची जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार आहे —पहिला टप्पा (एप्रिल ते सप्टेंबर 2026) : घर नोंदणी आणि गृहनिर्माण संबंधित माहिती गोळा केली जाईल.दुसरा टप्पा (फेब्रुवारी 2027) : लोकसंख्या मोजणी (Population Enumeration) करण्यात येईल.दोन्ही टप्पे जनगणना अधिनियम, 1948 अंतर्गत पार पाडले जातील. अधिकाऱ्यांनी नमूद केले की, या पूर्व चाचणी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक आहे. निवडलेल्या भागांतील रहिवाशांनी गणकांना अचूक माहिती द्यावी, जेणेकरून देशाच्या पुढील लोकसंख्या गणनेची प्रक्रिया सुरळीत पार पडेल.हेही वाचा वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर घसरलेठाणे बुलेट ट्रेन स्थानकाभोवती बिझनेस हब उभारण्याची योजना

मुंबईतील एम वेस्ट वॉर्डमध्ये होणार जनगणना चाचणी

भारताच्या 2027 च्या जनगणनेच्या तयारीला सुरुवात झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) जाहीर केले आहे की येत्या महिन्यात, म्हणजेच 10 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत, मुंबईतील एम वेस्ट प्रशासकीय विभागात (चेंबूर) जनगणना प्राथमिक चाचणी उपक्रम (Preliminary Test) राबवण्यात येणार आहे. हा उपक्रम देशभरातील जनगणना प्रक्रियेला अधिक प्रभावी आणि अचूक बनवण्यासाठीच्या तयारीचा एक भाग आहे. शेवटची जनगणना 2011 साली झाली होती.
जनगणना संचलनालयाच्या माहितीनुसार, या चाचणीमध्ये घर नोंदणी आणि गृहनिर्माण गणना (House Listing and Housing Enumeration) या सर्व महत्त्वाच्या बाबींचा समावेश असेल. रहिवाशांना स्वयं-नोंदणी (Self-enumeration) सुविधेद्वारे स्वतःची माहिती ऑनलाइन सादर करण्याचीही संधी असेल. ही सुविधा 1 ते 7 नोव्हेंबर 2025 दरम्यान उपलब्ध राहील. अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, घरोघरी भेट देणाऱ्या गणक (Enumerators) आणि पर्यवेक्षकांना सहकार्य करावे.
महाराष्ट्र हा या तयारीसाठी निवडलेल्या राज्यांपैकी एक असून, येथे तीन क्षेत्रांमध्ये ही चाचणी होणार आहे.
मुंबईतील एम वेस्ट वॉर्ड (चेंबूर)
चोपडा तालुका (जळगाव जिल्हा)
गगनबावडा तालुका (कोल्हापूर जिल्हा)
मुंबईत या उपक्रमासाठी एम वेस्ट वॉर्डमधील 135 घर नोंदणी ब्लॉक्स निश्चित करण्यात आले आहेत. राज्यभरात या सर्वेक्षणासाठी 402 गणक आणि पर्यवेक्षकांची टीम कार्यरत राहील.
मंगळवारी बीएमसीचे आयुक्त भूषण गगराणी यांनी जनगणना संचालनालयाच्या संचालक डॉ. निरुपमा जे. डांगे यांची भेट घेऊन या उपक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला पश्चिम उपनगर क्षेत्राचे अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा हे देखील उपस्थित होते.
भारत सरकारने आधीच जाहीर केले आहे की 2027 ची जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार आहे —
पहिला टप्पा (एप्रिल ते सप्टेंबर 2026) : घर नोंदणी आणि गृहनिर्माण संबंधित माहिती गोळा केली जाईल.
दुसरा टप्पा (फेब्रुवारी 2027) : लोकसंख्या मोजणी (Population Enumeration) करण्यात येईल.
दोन्ही टप्पे जनगणना अधिनियम, 1948 अंतर्गत पार पाडले जातील. अधिकाऱ्यांनी नमूद केले की, या पूर्व चाचणी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक आहे. निवडलेल्या भागांतील रहिवाशांनी गणकांना अचूक माहिती द्यावी, जेणेकरून देशाच्या पुढील लोकसंख्या गणनेची प्रक्रिया सुरळीत पार पडेल.हेही वाचावाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर घसरले
ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाभोवती बिझनेस हब उभारण्याची योजना

Go to Source