मुंबईकरांनी सावध व्हा! या पावसाळ्यात 22 वेळा हाय टायड अलर्ट येणार!

यंदा मुंबईत येत्या पावसाळ्यात 22 वेळा हाय टायड अलर्ट येण्याची शक्यता मुंबई नागरी संस्थे कडून वर्तवण्यात आली आहे. यंदा 4.84 मीटर पेक्षा जास्त उंच भरती येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून ही भरती जून ते सप्टेंबर 2024 दरम्यान येण्याची शक्यता आहे

मुंबईकरांनी सावध व्हा! या पावसाळ्यात 22 वेळा हाय टायड अलर्ट येणार!

यंदा मुंबईत येत्या पावसाळ्यात 22 वेळा हाय टायड अलर्ट येण्याची शक्यता मुंबई नागरी संस्थे कडून वर्तवण्यात आली आहे. यंदा 4.84 मीटर पेक्षा जास्त उंच भरती येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून ही भरती जून ते सप्टेंबर 2024 दरम्यान येण्याची शक्यता आहे. यंदा पावसाळ्यात जोरदार वादळे येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिंद महासागरात मान्सूनपूर्व आणि पावसाळ्यात वादळ येतात यंदाच्या वर्षी एप्रिल ते जून दरम्यान कोणतेही वादळ येणार नाही. 

मुंबई महापालिकेने मंगळवारी सांगितले की, मुंबईत येत्या पावसाळ्यात 4.84 मीटर पेक्षा जास्त उंच 22 हाय टाइड येण्याची शक्यता आहे. या मुळे सखल भागात पूर येतो. 

नागरिकांनी पावसाळ्यात समुद्र किनाऱ्यावर जाताना सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहन केलं आहे. 

गेल्या वर्षी जून मध्ये अरबी समुद्रावर बिपरजाय वादळ उठले होते. नंतर मागील वर्षी 2023 मध्ये बंगालच्या उपसागरावर मोचा नावाचे तीव्र चक्रीवादळ आले होते. 

Edited By- Priya Dixit   

 

Go to Source