मुंबईचा बिहारवर डावाने विजय
वृत्तसंस्था/ पाटणा
वेगवान गोलंदाज शिवम दुबे (10 धावांत 4 बळी) व रॉयस्टन डायस (35 धावांत 3 बळी) यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या बळावर मुंबईने रणजी करंडक स्पर्धेतील पहिल्याच साम्नयात बिहारवर एक डाव 51 धावांनी दणदणीत विजय मिळविला.
या सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी फॉलोऑननंतर 6 बाद 91 अशी स्थिती झाल्यानंतर बिहारचा पराभव निश्चित झाला होता. बिहारने पहिल्या डावात 100 धावा केल्या होत्या. मोहित अवस्थीने केवळ 27 धावांत 6 बळी टिपले होते. तर मुंबईने पहिल्या डावात 251 धावा जमविल्या होत्या. बिहारचा दुसरा डावही 100 धावांत आटोपल्याने त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या डावात 2 बळी मिळविणाऱ्या दुबेने दुसऱ्या डावात 10 धावांत 4 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक : बिहार प.डाव 100, दु.डाव 100 (दुबे 4-10, रॉयस्टन डायस 3-35), मुंबई प.डाव 251..
विशाखापटणम येथे झालेल्या अन्य एका सामन्यात रिकी भुईने 175 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळत आंध्रला बंगालविरुद्धचा सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळविले. बंगालने पहिल्या डावात 409 धावा जमविल्या होत्या. त्यामुळे आंध्रला पहिल्या डावात 36 धावांची नाममात्र आघाडी मिळाल्याने त्यांना 3 गुण मिळाले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बंगालने दुसऱ्या डावात 1 बाद 87 धावा जमविल्या होत्या. आंध्रच्या डावात हनुमा विहारी (51), शोएब खान (56) यांनीही अर्धशतके नोंदवली.
Home महत्वाची बातमी मुंबईचा बिहारवर डावाने विजय
मुंबईचा बिहारवर डावाने विजय
वृत्तसंस्था/ पाटणा वेगवान गोलंदाज शिवम दुबे (10 धावांत 4 बळी) व रॉयस्टन डायस (35 धावांत 3 बळी) यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या बळावर मुंबईने रणजी करंडक स्पर्धेतील पहिल्याच साम्नयात बिहारवर एक डाव 51 धावांनी दणदणीत विजय मिळविला. या सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी फॉलोऑननंतर 6 बाद 91 अशी स्थिती झाल्यानंतर बिहारचा पराभव निश्चित झाला होता. बिहारने पहिल्या डावात […]