दरड कोसळण्यापासून रोखण्यासाठी भूस्खलन भागात संरक्षण जाळीचा वापर
“मुंबई (mumbai)शहरातील गजबजलेल्या भागात सुरक्षा जाळ्या बसवून नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणे हे आमचे प्राधान्य आहे. मुंबईला दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त करण्याचे आमचे लक्ष्य आहे.” अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बुधवारी केली.मुंबईत अनेक कुटुंबे डोंगररांगांवर झोपडीत राहत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या झोपड्यांवर दरड कोसळण्याचा धोका असतो. मुंबईत अशी सुमारे 200 ठिकाणे आहेत. यातील काही ठिकाणे अत्यंत धोकादायक आहेत. “भूस्खलनाचा सर्वाधिक धोका पूर्व उपनगरात आहे. त्यापैकी, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) घाटकोपरच्या आझाद नगर परिसरात अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या आणि कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संरक्षक जाळी बसवण्याचे काम हाती घेतले आहे.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बुधवारी या कामाची पाहणी केली.मुंबईतील पूरप्रवण क्षेत्रात अशा प्रकारचे तंत्रज्ञान पहिल्यांदाच वापरण्यात आले आहे. 31 संभाव्य ठिकाणी, भूस्खलन प्रवण क्षेत्रांची स्थिती लक्षात घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञान सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबईतील भूस्खलनप्रवण भागात 31 ठिकाणी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आज कामाची पाहणी केली.मुंबई शहरातील गजबजलेल्या भागात सुरक्षा जाळ्या बसवून या भागांना अधिक सुरक्षित बनवण्यात येणार आहे. तसेच तेथील नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे याला प्राधान्य देणार आहे. तसेच मुंबईला दरड कोसळण्यापासून मुक्त करण्याचा आमचा उद्देश आहे. त्याचवेळी म्हाडा (Mhada), महापालिका, एमआयडीसी (MIDC) आणि अन्य सरकारी यंत्रणांच्या सहकार्याने धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरवू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी घाटकोपर (Ghatkopar) येथे दिले.हेही वाचा’AC Local चं कौतुक काय करताय, गर्दीने प्रवाशांचे जीव जात आहेत’; हायकोर्टाने रेल्वेला झापलंमुंबईतील बाणगंगा तलावाचे नुकसान करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध FIR
Home महत्वाची बातमी दरड कोसळण्यापासून रोखण्यासाठी भूस्खलन भागात संरक्षण जाळीचा वापर
दरड कोसळण्यापासून रोखण्यासाठी भूस्खलन भागात संरक्षण जाळीचा वापर
“मुंबई (mumbai)शहरातील गजबजलेल्या भागात सुरक्षा जाळ्या बसवून नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणे हे आमचे प्राधान्य आहे. मुंबईला दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त करण्याचे आमचे लक्ष्य आहे.” अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बुधवारी केली.
मुंबईत अनेक कुटुंबे डोंगररांगांवर झोपडीत राहत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या झोपड्यांवर दरड कोसळण्याचा धोका असतो. मुंबईत अशी सुमारे 200 ठिकाणे आहेत. यातील काही ठिकाणे अत्यंत धोकादायक आहेत.
“भूस्खलनाचा सर्वाधिक धोका पूर्व उपनगरात आहे. त्यापैकी, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) घाटकोपरच्या आझाद नगर परिसरात अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या आणि कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संरक्षक जाळी बसवण्याचे काम हाती घेतले आहे.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बुधवारी या कामाची पाहणी केली.
मुंबईतील पूरप्रवण क्षेत्रात अशा प्रकारचे तंत्रज्ञान पहिल्यांदाच वापरण्यात आले आहे. 31 संभाव्य ठिकाणी, भूस्खलन प्रवण क्षेत्रांची स्थिती लक्षात घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञान सुरू करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबईतील भूस्खलनप्रवण भागात 31 ठिकाणी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आज कामाची पाहणी केली.
मुंबई शहरातील गजबजलेल्या भागात सुरक्षा जाळ्या बसवून या भागांना अधिक सुरक्षित बनवण्यात येणार आहे.
तसेच तेथील नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे याला प्राधान्य देणार आहे. तसेच मुंबईला दरड कोसळण्यापासून मुक्त करण्याचा आमचा उद्देश आहे. त्याचवेळी म्हाडा (Mhada), महापालिका, एमआयडीसी (MIDC) आणि अन्य सरकारी यंत्रणांच्या सहकार्याने धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरवू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी घाटकोपर (Ghatkopar) येथे दिले.हेही वाचा
‘AC Local चं कौतुक काय करताय, गर्दीने प्रवाशांचे जीव जात आहेत’; हायकोर्टाने रेल्वेला झापलं
मुंबईतील बाणगंगा तलावाचे नुकसान करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध FIR