मुंबईत ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाची शक्यता
मुंबईत (Mumbai) सोमवारी सकाळपासून ढगाळ (Cloudy Sky) वातावरण होते. त्यामुळे उन्हाच्या काहिलीपासून मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मंगळवारीही ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाची (Mumbai Rain) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई महानगर प्रदेश (MMR) सह शहर आणि त्याच्या उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.तापमान (Temperature) किमान 27 अंश सेल्सिअस ते कमाल 33 अंश सेल्सिअस, सरासरी 28 अंश सेल्सिअस पर्यंत असण्याची अपेक्षा आहे. दक्षिणेकडून 9.3 किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.🗓️ १८ जून २०२४⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.🌊भरती -सायंकाळी – ०९:४४ वाजता – ३.६७ मीटरओहोटी -दुपारी – ०३:२६ वाजता – २.२६ मीटर🌊भरती -रात्री – ०९:१४ वाजता – ३.३९ मीटरओहोटी -(उद्या – १९.०६.२०२४) -…— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 18, 2024 बुधवारी किमान तापमान 25 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता असून, मुसळधार पावसाचा (Mumbai Rains) अंदाज आहे. IMD च्या अंदाजानुसार आठवड्याच्या उत्तरार्धात किमान तापमान 24-25 अंश सेल्सिअस दरम्यान चढ-उतार होईल, तर कमाल तापमानात किंचित घट अपेक्षित आहे, 31-32 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.दरम्यान, आठवडाभर विश्रांती घेतलेला पाऊस कोकण (Konkan Belt) पट्ट्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. अरबी समुद्रात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने जून अखेरपर्यंत मुंबईसह कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता कुलाबा हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. मुसळधार पावसाचा अंदाज बघता कोकण पट्ट्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हेही वाचानवी मुंबईत आठवड्यातून तीन दिवस पाणीकपात
मुंबईकरांच्या खिशाला कात्री, भाजीपाला महागला!
Home महत्वाची बातमी मुंबईत ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाची शक्यता
मुंबईत ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाची शक्यता
मुंबईत (Mumbai) सोमवारी सकाळपासून ढगाळ (Cloudy Sky) वातावरण होते. त्यामुळे उन्हाच्या काहिलीपासून मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मंगळवारीही ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाची (Mumbai Rain) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई महानगर प्रदेश (MMR) सह शहर आणि त्याच्या उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
तापमान (Temperature) किमान 27 अंश सेल्सिअस ते कमाल 33 अंश सेल्सिअस, सरासरी 28 अंश सेल्सिअस पर्यंत असण्याची अपेक्षा आहे. दक्षिणेकडून 9.3 किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.🗓️ १८ जून २०२४
⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
🌊भरती –सायंकाळी – ०९:४४ वाजता – ३.६७ मीटर
ओहोटी –दुपारी – ०३:२६ वाजता – २.२६ मीटर
🌊भरती –रात्री – ०९:१४ वाजता – ३.३९ मीटर
ओहोटी –(उद्या – १९.०६.२०२४) -…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 18, 2024
बुधवारी किमान तापमान 25 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता असून, मुसळधार पावसाचा (Mumbai Rains) अंदाज आहे. IMD च्या अंदाजानुसार आठवड्याच्या उत्तरार्धात किमान तापमान 24-25 अंश सेल्सिअस दरम्यान चढ-उतार होईल, तर कमाल तापमानात किंचित घट अपेक्षित आहे, 31-32 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
दरम्यान, आठवडाभर विश्रांती घेतलेला पाऊस कोकण (Konkan Belt) पट्ट्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. अरबी समुद्रात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने जून अखेरपर्यंत मुंबईसह कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता कुलाबा हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. मुसळधार पावसाचा अंदाज बघता कोकण पट्ट्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हेही वाचा
नवी मुंबईत आठवड्यातून तीन दिवस पाणीकपातमुंबईकरांच्या खिशाला कात्री, भाजीपाला महागला!