पुढच्या 48 तासात पावसाची शक्यता
फेंगल चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतरही अरबी समुद्रात कमी दाबाचा प्रभाव कायम आहे. या प्रभावाखाली मुंबईमध्ये मंगळवारी ढगाळ वातावरण होते. बुधवारीही मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर गुरुवारपासून आभाळ निरभ्र होण्यास सुरुवात होईल.पुढच्या 48 तासात तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईमध्ये गारठा जाणवू लागलेला असताना फेंगलनंतर पुन्हा एकदा वातावरणाचा ताप मंगळवारी जाणवला. अरबी समुद्रामध्ये असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता अधिक असल्याने मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झाले. तसेच यामुळे आर्द्रतेतही वाढ झाली. कुलाबा येथे 70 टक्क्यांहून अधिक तर सांताक्रूझ येथे 60 टक्क्यांहून अधिक आर्द्रतेची नोंद झाली. सध्या वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून असल्याने तापमान चढे आहे. मुंबईमध्ये सांताक्रूझ येथे 34.5 आणि कुलाबा येथे 33.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.पुढील चार ते पाच दिवसांमध्ये कमाल तापमानामध्ये फारसा फरक पडण्याची शक्यता नसल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे. सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे 35.2 अंश सेल्सिअस होते. त्या खालोखाल अलिबाग आणि सांताक्रूझ येथे तापमान नोंदले गेले. शनिवारपर्यंत मुंबईत चढे तापमान राहील, अशी शक्यता असून रविवारी किमान आणि कमाल तापमानामध्ये किंचित घट अपेक्षित आहे.हेही वाचामहापरिनिर्वाण दिन : 5 अनारक्षित विशेष गाड्या धावणार
डिसेंबरमध्ये ‘या’ दिवशी मुंबईकरांना सुट्टी जाहीर
Home महत्वाची बातमी पुढच्या 48 तासात पावसाची शक्यता
पुढच्या 48 तासात पावसाची शक्यता
फेंगल चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतरही अरबी समुद्रात कमी दाबाचा प्रभाव कायम आहे. या प्रभावाखाली मुंबईमध्ये मंगळवारी ढगाळ वातावरण होते. बुधवारीही मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर गुरुवारपासून आभाळ निरभ्र होण्यास सुरुवात होईल.
पुढच्या 48 तासात तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबईमध्ये गारठा जाणवू लागलेला असताना फेंगलनंतर पुन्हा एकदा वातावरणाचा ताप मंगळवारी जाणवला. अरबी समुद्रामध्ये असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता अधिक असल्याने मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झाले.
तसेच यामुळे आर्द्रतेतही वाढ झाली. कुलाबा येथे 70 टक्क्यांहून अधिक तर सांताक्रूझ येथे 60 टक्क्यांहून अधिक आर्द्रतेची नोंद झाली. सध्या वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून असल्याने तापमान चढे आहे. मुंबईमध्ये सांताक्रूझ येथे 34.5 आणि कुलाबा येथे 33.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
पुढील चार ते पाच दिवसांमध्ये कमाल तापमानामध्ये फारसा फरक पडण्याची शक्यता नसल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे. सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे 35.2 अंश सेल्सिअस होते. त्या खालोखाल अलिबाग आणि सांताक्रूझ येथे तापमान नोंदले गेले.
शनिवारपर्यंत मुंबईत चढे तापमान राहील, अशी शक्यता असून रविवारी किमान आणि कमाल तापमानामध्ये किंचित घट अपेक्षित आहे.हेही वाचा
महापरिनिर्वाण दिन : 5 अनारक्षित विशेष गाड्या धावणारडिसेंबरमध्ये ‘या’ दिवशी मुंबईकरांना सुट्टी जाहीर