मुंबईत धुरक्याची चादर

मुंबईत सोमवार, 2 फेब्रुवारीला मुंबईकरांची सकाळ दाट धुक्याने झाली. शहरातील अनेक भाग दाट धुक्याच्या (स्मॉग) चादरीखाली झाकले गेले होते. त्यामुळे विजिबिलीटी कमी झाली आणि पहाटे प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.  भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, मुंबईत पहाटेच्या वेळेत धुरकट वातावरण राहण्याची शक्यता आहे. दिवसा आकाश काहीसे स्वच्छ दिसते. तापमान २३ अंश सेल्सिअस ते ३१ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मागील आठवडाभर तापमानाचा पॅटर्न बहुतांशी स्थिर आहे. तरी, हवेच्या गुणवत्तेच्या पातळीत चिंताजनक चढउतार दिसून येत आहेत. त्यामुळे आरोग्यतज्ज्ञांबरोबरच नागरिकांमध्येही चिंता वाढली आहे. AQI अजूनही धोक्याच्या पातळीवर शहरात AQI वाढताना दिसतोय AQI.in च्या आकडेवारीनुसार, सध्या मुंबईचा एकूण एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) सुमारे 300 इतका असून तो ‘अनारोग्यदायी’ (Unhealthy) श्रेणीत येतो. विशेष चिंतेची बाब म्हणजे हे प्रदूषण सातत्याने वाढत आहे. मागील तीन दिवसांत एकूण AQI उच्च पातळीवर राहिला असला तरी, गेल्या 24 तासांत परिस्थिती अधिक बिघडल्याचे दिसून आले आहे. पहाटेच्या वेळेत शहरातील हवा ‘खराब’ (Poor) श्रेणीत राहते आणि दिवसा थोडीशी सुधारणा होते. मात्र रविवारी AQI पातळी सातत्याने 250 ते 310 आहे. ज्यामुळे नागरिकांना दीर्घकाळ अनारोग्यदायी हवेचा सामना करावा लागला. अनेक बांधकामस्थळांवरून उडणारी धूळ वातावरणात साचून सूक्ष्म कण (पार्टिक्युलेट मॅटर) तयार करेल.  पहाटेच्या वेळेत वाऱ्याचा वेग कमी असल्याने ही प्रदूषके पसरून न जाता शहराच्या मोठ्या भागात अडकून राहतात. काही भागांत अत्यंत धोकादायक पातळी शहरातील अनेक भागांत हवेची गुणवत्ता अतिधोकादायक पातळीवर नोंदवली गेली. वडाळा ट्रक टर्मिनस (374), शिवडी पश्चिम (371), स्वस्तिक पार्क (359) आणि हिंदू कॉलनी (356) या भागांतही तीव्र प्रदूषण नोंदवले गेले. याच्या उलट, काही मर्यादित भागांत तुलनेने स्वच्छ हवा आढळली. गामदेवी स्टेशन 1 येथे AQI 52 नोंदवला गेला, जो ‘चांगला’ (Good) श्रेणीत येतो. ठाकूर व्हिलेज (170 – मध्यम), हनुमान नगर (197 – खराब) आणि विद्या नगरी (213 – अनारोग्यदायी) या भागांत प्रदूषणाच्या वेगवेगळ्या पातळी दिसून आल्या. मात्र अनेक ठिकाणी पातळी सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त होती. मानक हवेच्या गुणवत्तेच्या वर्गीकरणानुसार, AQI 0 ते 50 ‘चांगला’, 51 ते 100 ‘मध्यम’, 101 ते 200 ‘खराब’, 201 ते 300 ‘अनारोग्यदायी’ तर 300 पेक्षा जास्त पातळी ‘तीव्र’ किंवा ‘अतिधोकादायक’ मानली जाते.कूरार व्हिलेज (170 – मध्यम), हनुमान नगर (197 – खराब) आणि विद्या नगरी (213 – अनारोग्यदायी) या भागांत प्रदूषणाच्या वेगवेगळ्या पातळी दिसून आल्या. मात्र अनेक ठिकाणी पातळी सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त होती. मानक हवेच्या गुणवत्तेच्या वर्गीकरणानुसार, AQI 0 ते 50 ‘चांगला’, 51 ते 100 ‘मध्यम’, 101 ते 200 ‘खराब’, 201 ते 300 ‘अनारोग्यदायी’ तर 300 पेक्षा जास्त पातळी ‘तीव्र’ किंवा ‘अतिधोकादायक’ मानली जाते.

मुंबईत धुरक्याची चादर

मुंबईत सोमवार, 2 फेब्रुवारीला मुंबईकरांची सकाळ दाट धुक्याने झाली. शहरातील अनेक भाग दाट धुक्याच्या (स्मॉग) चादरीखाली झाकले गेले होते. त्यामुळे विजिबिलीटी कमी झाली आणि पहाटे प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, मुंबईत पहाटेच्या वेळेत धुरकट वातावरण राहण्याची शक्यता आहे. दिवसा आकाश काहीसे स्वच्छ दिसते. तापमान २३ अंश सेल्सिअस ते ३१ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मागील आठवडाभर तापमानाचा पॅटर्न बहुतांशी स्थिर आहे. तरी, हवेच्या गुणवत्तेच्या पातळीत चिंताजनक चढउतार दिसून येत आहेत. त्यामुळे आरोग्यतज्ज्ञांबरोबरच नागरिकांमध्येही चिंता वाढली आहे.AQI अजूनही धोक्याच्या पातळीवरशहरात AQI वाढताना दिसतोयAQI.in च्या आकडेवारीनुसार, सध्या मुंबईचा एकूण एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) सुमारे 300 इतका असून तो ‘अनारोग्यदायी’ (Unhealthy) श्रेणीत येतो. विशेष चिंतेची बाब म्हणजे हे प्रदूषण सातत्याने वाढत आहे. मागील तीन दिवसांत एकूण AQI उच्च पातळीवर राहिला असला तरी, गेल्या 24 तासांत परिस्थिती अधिक बिघडल्याचे दिसून आले आहे. पहाटेच्या वेळेत शहरातील हवा ‘खराब’ (Poor) श्रेणीत राहते आणि दिवसा थोडीशी सुधारणा होते. मात्र रविवारी AQI पातळी सातत्याने 250 ते 310 आहे. ज्यामुळे नागरिकांना दीर्घकाळ अनारोग्यदायी हवेचा सामना करावा लागला. अनेक बांधकामस्थळांवरून उडणारी धूळ वातावरणात साचून सूक्ष्म कण (पार्टिक्युलेट मॅटर) तयार करेल.  पहाटेच्या वेळेत वाऱ्याचा वेग कमी असल्याने ही प्रदूषके पसरून न जाता शहराच्या मोठ्या भागात अडकून राहतात.काही भागांत अत्यंत धोकादायक पातळीशहरातील अनेक भागांत हवेची गुणवत्ता अतिधोकादायक पातळीवर नोंदवली गेली. वडाळा ट्रक टर्मिनस (374), शिवडी पश्चिम (371), स्वस्तिक पार्क (359) आणि हिंदू कॉलनी (356) या भागांतही तीव्र प्रदूषण नोंदवले गेले.याच्या उलट, काही मर्यादित भागांत तुलनेने स्वच्छ हवा आढळली. गामदेवी स्टेशन 1 येथे AQI 52 नोंदवला गेला, जो ‘चांगला’ (Good) श्रेणीत येतो. ठाकूर व्हिलेज (170 – मध्यम), हनुमान नगर (197 – खराब) आणि विद्या नगरी (213 – अनारोग्यदायी) या भागांत प्रदूषणाच्या वेगवेगळ्या पातळी दिसून आल्या. मात्र अनेक ठिकाणी पातळी सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त होती.मानक हवेच्या गुणवत्तेच्या वर्गीकरणानुसार, AQI 0 ते 50 ‘चांगला’, 51 ते 100 ‘मध्यम’, 101 ते 200 ‘खराब’, 201 ते 300 ‘अनारोग्यदायी’ तर 300 पेक्षा जास्त पातळी ‘तीव्र’ किंवा ‘अतिधोकादायक’ मानली जाते.कूरार व्हिलेज (170 – मध्यम), हनुमान नगर (197 – खराब) आणि विद्या नगरी (213 – अनारोग्यदायी) या भागांत प्रदूषणाच्या वेगवेगळ्या पातळी दिसून आल्या. मात्र अनेक ठिकाणी पातळी सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त होती.
मानक हवेच्या गुणवत्तेच्या वर्गीकरणानुसार, AQI 0 ते 50 ‘चांगला’, 51 ते 100 ‘मध्यम’, 101 ते 200 ‘खराब’, 201 ते 300 ‘अनारोग्यदायी’ तर 300 पेक्षा जास्त पातळी ‘तीव्र’ किंवा ‘अतिधोकादायक’ मानली जाते.

Go to Source