मुंबईचा 120 धावांत खुर्दा
अखिल हेरवाडकर : 60 धावा : श्रेयस गोपाल : 4 धावांत 3 बळी
वृत्तसंस्था / मुंबई
2026 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कर्नाटकाच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबईचा पहिला डाव केवळ 120 धावांत आटोपला. त्यानंतर कर्नाटकाने दिवसअखेर पहिल्या डावात 2 बाद 110 धावा जमविल्या. कर्नाटकाच्या कविरप्पा, प्रसिद्धकृष्णा आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. मुंबईतर्फे अखिल हेरवाडकरने अर्धशतक झळकविले.
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कर्नाटकाच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर त्यांचा पहिला डाव 48.1 षटकांत 120 धावांत आटोपला. सलामीच्या अखिल हेरवाडकरने 138 चेंडूत 9 चौकारांसह 60 धावा झळकविल्या. कर्नाटक शार्दुल ठाकुरने 3 चौकारांसह 16, सिद्धेश लाडने 1 चौकारासह 12 तर शेडगेने 1 चौकारासह 10 धावा केल्या. त्यानंतर कर्नाटकाने दिवसअखेर 2 बाद 110 धावा जमविल्या. मयांक अगरवाल 1 षटकार आणि 8 चौकारांसह 54 धावांवर खेळत आहे. सलामीचा केएल राहुल 6 चौकारांसह 28 धावांवर बाद झाला. कर्णधार पडिकलने 2 चौकारांसह 17 धावा केल्या. मुंबईतर्फे अवस्थी आणि शेडगे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. कर्नाटकाचा संघ आता 10 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 8 गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक: मुंबई प. डाव 48.1 षटकांत सर्वबाद 120 (अखिल हेरवाडकर 60, ठाकुर 16, लाड 12, अवांतर 14, कविरप्पा, प्रसिद्ध कृष्णा, श्रेयस गोपाल प्रत्येकी 3 बळी), कर्नाटक प. डाव 26 षटकांत 2 बाद 110 (अगरवाल खेळत आहे 54, केएल राहुल 28, पडिक्कल 17, अवस्थी व शेडगे प्रत्येकी 1 बळी).
Home महत्वाची बातमी मुंबईचा 120 धावांत खुर्दा
मुंबईचा 120 धावांत खुर्दा
अखिल हेरवाडकर : 60 धावा : श्रेयस गोपाल : 4 धावांत 3 बळी वृत्तसंस्था / मुंबई 2026 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कर्नाटकाच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबईचा पहिला डाव केवळ 120 धावांत आटोपला. त्यानंतर कर्नाटकाने दिवसअखेर पहिल्या डावात 2 बाद 110 धावा जमविल्या. कर्नाटकाच्या कविरप्पा, प्रसिद्धकृष्णा आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी […]
