2032 मध्ये मुंबईवर लघुग्रहाचे सावट

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये “सिटी किलर” (city killer) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लघुग्रहाचा शोध लागला. या ग्रहाचे शास्त्रीय नाव 2024 YR4 आहे.  जगभरातील खगोलशास्त्रज्ञ या लघुग्रहावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.   हा लघुग्रह 130 ते 300 फूट रुंदीचा आहे. हा लघुग्रह (asteroid) एका मोठ्या कार्यालयीन इमारतीच्या आकाराचा आहे. 22 डिसेंबर 2032 रोजी जवळून उड्डाण करताना पृथ्वीवर (earth) आदळण्याची शक्यता सध्या 1.5 टक्के आहे. या लघुग्रहाच्या आघाताची शक्यता 1 टक्क्याच्या गंभीर मर्यादेपेक्षा जास्त असल्याने नासासह (NASA) जागतिक अंतराळ संस्था त्याच्या मार्गावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नासाच्या मूल्यांकनावर आधारित आणि सायंटिफिक अमेरिकनने नोंदवलेल्या लघुग्रह 2024YR4 चे संभाव्य प्रभावित क्षेत्र हे पूर्व पॅसिफिक महासागरापासून दक्षिण आशियापर्यंत आहे. या क्षेत्रामध्ये बोगोटा (कोलंबिया), लागोस (नायजेरिया) आणि मुंबई (mumbai) (भारत) सारखी दाट लोकवस्ती असलेली शहरे समाविष्ट आहेत.  तसेच हा लघुग्रह चंद्रावर आदळण्याची शक्यता देखील खूपच कमी आहे. जर लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर त्याचे परिणाम विनाशकारी असू शकतात. तसेच या लघुग्रहाचे वातावरणात विघटन झाले किंवा ह्याचे अवशेष पृष्ठभागावर आदळले तर याचे तात्काळ परिणाम हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटासारखे असू शकतात. ज्यामुळे त्याच्या मार्गातील कोणत्याही शहराचा नाश होण्याची शक्यता असते. तथापि, टक्कर होण्याची शक्यता दररोज कमी होत असल्याने शास्त्रज्ञ आशावादी आहेत. प्लॅनेटरी सोसायटीचे मुख्य शास्त्रज्ञ ब्रूस बेट्स यांनी न्यू यॉर्क पोस्टला सांगितले की, पुढील काही महिन्यांत किंवा वर्षांत टक्कर होण्याची शक्यता शून्यावर येऊ शकते. तरीही नासाचे खगोलशास्त्रज्ञ कोणताही धोका पत्करत नाहीत. लघुग्रहाचा अंदाजित मार्ग सुधारण्यासाठी नासा चीन राष्ट्रीय अंतराळ प्रशासन (CNSA), रोसकॉसमॉस (रशिया) आणि युरोपियन अंतराळ संस्था (ESA) यासह आंतरराष्ट्रीय समकक्षांसोबत एकत्रितरित्या यावर काम करत आहे. खगोलशास्त्रज्ञांची एक टीम लघुग्रहाच्या आकाराचे आणि मार्गक्रमणाचे अचूक अंदाज मिळविण्यासाठी नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा वापर करण्याची योजना आखत आहे. हेही वाचा खारघरमध्ये फर्टिलिटी आणि आयव्हीएफ सेंटर सुरू कोस्टल रोडवर डिजिटल साईनबोर्ड लावण्याचा प्रस्ताव

2032 मध्ये मुंबईवर लघुग्रहाचे सावट

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये “सिटी किलर” (city killer) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लघुग्रहाचा शोध लागला. या ग्रहाचे शास्त्रीय नाव 2024 YR4 आहे.  जगभरातील खगोलशास्त्रज्ञ या लघुग्रहावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.  हा लघुग्रह 130 ते 300 फूट रुंदीचा आहे. हा लघुग्रह (asteroid) एका मोठ्या कार्यालयीन इमारतीच्या आकाराचा आहे. 22 डिसेंबर 2032 रोजी जवळून उड्डाण करताना पृथ्वीवर (earth) आदळण्याची शक्यता सध्या 1.5 टक्के आहे. या लघुग्रहाच्या आघाताची शक्यता 1 टक्क्याच्या गंभीर मर्यादेपेक्षा जास्त असल्याने नासासह (NASA) जागतिक अंतराळ संस्था त्याच्या मार्गावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.नासाच्या मूल्यांकनावर आधारित आणि सायंटिफिक अमेरिकनने नोंदवलेल्या लघुग्रह 2024YR4 चे संभाव्य प्रभावित क्षेत्र हे पूर्व पॅसिफिक महासागरापासून दक्षिण आशियापर्यंत आहे. या क्षेत्रामध्ये बोगोटा (कोलंबिया), लागोस (नायजेरिया) आणि मुंबई (mumbai) (भारत) सारखी दाट लोकवस्ती असलेली शहरे समाविष्ट आहेत. तसेच हा लघुग्रह चंद्रावर आदळण्याची शक्यता देखील खूपच कमी आहे. जर लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर त्याचे परिणाम विनाशकारी असू शकतात. तसेच या लघुग्रहाचे वातावरणात विघटन झाले किंवा ह्याचे अवशेष पृष्ठभागावर आदळले तर याचे तात्काळ परिणाम हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटासारखे असू शकतात. ज्यामुळे त्याच्या मार्गातील कोणत्याही शहराचा नाश होण्याची शक्यता असते.तथापि, टक्कर होण्याची शक्यता दररोज कमी होत असल्याने शास्त्रज्ञ आशावादी आहेत. प्लॅनेटरी सोसायटीचे मुख्य शास्त्रज्ञ ब्रूस बेट्स यांनी न्यू यॉर्क पोस्टला सांगितले की, पुढील काही महिन्यांत किंवा वर्षांत टक्कर होण्याची शक्यता शून्यावर येऊ शकते.तरीही नासाचे खगोलशास्त्रज्ञ कोणताही धोका पत्करत नाहीत. लघुग्रहाचा अंदाजित मार्ग सुधारण्यासाठी नासा चीन राष्ट्रीय अंतराळ प्रशासन (CNSA), रोसकॉसमॉस (रशिया) आणि युरोपियन अंतराळ संस्था (ESA) यासह आंतरराष्ट्रीय समकक्षांसोबत एकत्रितरित्या यावर काम करत आहे.खगोलशास्त्रज्ञांची एक टीम लघुग्रहाच्या आकाराचे आणि मार्गक्रमणाचे अचूक अंदाज मिळविण्यासाठी नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा वापर करण्याची योजना आखत आहे. हेही वाचाखारघरमध्ये फर्टिलिटी आणि आयव्हीएफ सेंटर सुरूकोस्टल रोडवर डिजिटल साईनबोर्ड लावण्याचा प्रस्ताव

Go to Source