नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांची कारवाई
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई वाहतूक विभागाने (mumbai police) विशेष मोहिम राबवली. मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि नवी मुंबई येथे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (New Year’s eve) मद्यप्राशन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेत 1,000 हून अधिक व्यक्तींना दंड ठोठावण्यात आला आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी रात्री 8:00 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2025 च्या सकाळपर्यंत 15,000 हून अधिक पोलीस (mumbai police) तैनात करण्यात आले होते.या कालावधीत संपूर्ण शहरात 107 ठिकाणी चौक्या उभारण्यात आल्या होत्या. तसेच यादरम्यान एकूण 46,143 वाहनांची तपासणी करण्यात आली.अहवालानुसार, वाहतूक विभागाने 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये वाहतुकीचे (traffic) नियम मोडणाऱ्यांवर होणाऱ्या कारवायांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे.ट्रॅफिक पोलिसांनी ई-चालानद्वारे 17,800 वाहतूक नियम उल्लंघनाच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच मद्यप्राशन करुन स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात आणला. या प्रकरणी एकूण 89,19,750 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.दरम्यान, 31 डिसेंबर 2023 रोजी दारू पिऊन गाडी चालवण्याची 333 प्रकरणे नोंदवली गेली होती.मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत 5,670 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच 17,647 व्यक्तींवर वाहतूक नियमांचे (mumbai traffic) उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली.याव्यतिरिक्त, मद्यपान करून वाहन चालविण्याच्या 333 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. “ड्रंक अँड ड्राइव्ह” (drink and drive) च्या तरतुदींनुसार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या 2,893 वाहनचालकांवर दंड आकारण्यात आला आहे. तर 1,923 वाहनचालकांवर हेल्मेटशिवाय वाहन चालवल्याबद्दल आणि 1,731 जणांना सिग्नल तोडून वाहन चालवल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहेनवी मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की नाकाबंदी दरम्यान त्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 2,357 वाहनचालकांवर कारवाई केलीठाण्यात 369 जण दारूच्या नशेत वाहन चालवताना आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय मीरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 61 जणांवर कारवाई करण्यात आली.पोलीस आयुक्त, विशेष पोलीस आयुक्त आणि सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. .पोलिसांनी सांगितले की, शहरातील अनुचित घटना टाळण्यासाठी, कडक सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या आणि तपासणी दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.त्यांच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून योग्य ती कारवाई करण्यात आली आहे.हेही वाचास्ट्रीट फूड अधिक सुरक्षित करण्याचा महापालिकेचा निर्णयचायनीज मांजावर ठाणे महापालिकेची बंदी
Home महत्वाची बातमी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांची कारवाई
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांची कारवाई
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई वाहतूक विभागाने (mumbai police) विशेष मोहिम राबवली. मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि नवी मुंबई येथे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (New Year’s eve) मद्यप्राशन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली.
या विशेष मोहिमेत 1,000 हून अधिक व्यक्तींना दंड ठोठावण्यात आला आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी रात्री 8:00 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2025 च्या सकाळपर्यंत 15,000 हून अधिक पोलीस (mumbai police) तैनात करण्यात आले होते.
या कालावधीत संपूर्ण शहरात 107 ठिकाणी चौक्या उभारण्यात आल्या होत्या. तसेच यादरम्यान एकूण 46,143 वाहनांची तपासणी करण्यात आली.
अहवालानुसार, वाहतूक विभागाने 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये वाहतुकीचे (traffic) नियम मोडणाऱ्यांवर होणाऱ्या कारवायांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे.
ट्रॅफिक पोलिसांनी ई-चालानद्वारे 17,800 वाहतूक नियम उल्लंघनाच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच मद्यप्राशन करुन स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात आणला. या प्रकरणी एकूण 89,19,750 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
दरम्यान, 31 डिसेंबर 2023 रोजी दारू पिऊन गाडी चालवण्याची 333 प्रकरणे नोंदवली गेली होती.
मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत 5,670 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच 17,647 व्यक्तींवर वाहतूक नियमांचे (mumbai traffic) उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली.
याव्यतिरिक्त, मद्यपान करून वाहन चालविण्याच्या 333 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. “ड्रंक अँड ड्राइव्ह” (drink and drive) च्या तरतुदींनुसार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या 2,893 वाहनचालकांवर दंड आकारण्यात आला आहे. तर 1,923 वाहनचालकांवर हेल्मेटशिवाय वाहन चालवल्याबद्दल आणि 1,731 जणांना सिग्नल तोडून वाहन चालवल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे
नवी मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की नाकाबंदी दरम्यान त्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 2,357 वाहनचालकांवर कारवाई केली
ठाण्यात 369 जण दारूच्या नशेत वाहन चालवताना आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय मीरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 61 जणांवर कारवाई करण्यात आली.
पोलीस आयुक्त, विशेष पोलीस आयुक्त आणि सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. .
पोलिसांनी सांगितले की, शहरातील अनुचित घटना टाळण्यासाठी, कडक सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या आणि तपासणी दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
त्यांच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून योग्य ती कारवाई करण्यात आली आहे.हेही वाचा
स्ट्रीट फूड अधिक सुरक्षित करण्याचा महापालिकेचा निर्णय
चायनीज मांजावर ठाणे महापालिकेची बंदी