5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री शपथविधी समारंभासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शपथविधी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी दुपारी 12:00 ते कार्यक्रम संपेपर्यंत वाहतूक नियम लागू राहतील. आझाद मैदानावर पार्किंगची सुविधा नसल्यामुळे, लोकांना सार्वजनिक वाहतूक, विशेषतः लोकल ट्रेनचा वापर करण्याची विनंती केली जाते. गुरुवारी या कालावधीत अनेक मार्ग नो-एंट्री झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.गुरुवारी आझाद मैदान आणि आजूबाजूच्या परिसरात गर्दी अपेक्षित असल्याने मुंबई पोलिसांनी जनतेला त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.’हे’ मार्ग बंदसीएसएमटी जंक्शन ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) – दोन्ही दिशांना वाहतुकीस बंदी असेल.चाफेकर बंधू चौक (OCS जंक्शन) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) या दोन्ही हद्दीतील वाहतुकीस बंदी असेल.महापालिका मार्ग – सीएसएमटी जंक्शन ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) दोन्ही दिशेला वाहतुकीस बंदी असेल.चाफेकर बंधू चौक (OCS जंक्शन) ते CSMT जंक्शन – रहदारीला मनाई असेल.मेघदूत ब्रिज (प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज) [दक्षिण बाउंड] – एनएस रोड आणि कोस्टल रोडकडून शामलदास गांधी जंक्शनकडे जाणारी वाहतूक प्रतिबंधित असेल.रामभाऊ साळगावकर रस्ता (एकमार्गी) – इंदू क्लिनिक जंक्शन (सय्यद जमादार चौक) ते व्होल्गा चौक हा रस्ता दुतर्फा वाहतुकीसाठी खुला असेल.मार्ग वळवण्यात आलेLT मार्ग – चकाला जंक्शन – उजवे वळण – DN रोड – CSMT जंक्शनच्या इथून तुम्ही इच्छित स्थळ गाठू शकता. चाफेकर बंधू चौक (OCS जंक्शन) – हुतात्मा चौक – काळाघोडा – के दुभाष मार्ग – शहीद भगतसिंग मार्ग इथून तुम्ही इच्छित स्थळ गाठू शकता. हेही वाचाडिसेंबरमध्ये ‘या’ दिवशी मुंबईकरांना सुट्टी जाहीर
महापरिनिर्वाण दिन : 5 अनारक्षित विशेष गाड्या धावणार
दक्षिण मुंबईत 5 डिसेंबरला वाहतुकीत बदल, ‘हे’ मार्ग वळवले