टु व्हिलरवर मागे बसणाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे
हेल्मेट नसलेले दुचाकीस्वार (bike riders) आणि मागे बसणाऱ्या सहप्रवाशांवर (rides) कारवाई करण्यात येणार आहेत. राज्य परिवहन विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात दुचाकीस्वार (two wheelers) आणि हेल्मेटशिवाय प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांविरोधात कारवाई आणखी कठोर होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षात मुंबईतील (mumbai) पोलिसांकडून 1770 हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून आजवर 107 कोटी रुपयांचा दंड वसूल केला गेला आहे.विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्या सहप्रवासी यांचा अपघातात मृत्यू आणि जखमी होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांवर आणि पाठीमागे बसणारे सहप्रवासी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश परिवहन विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.त्यासाठी वाहतूक पोलिसांचे ई-चलान मशिन बदलून स्वतंत्ररित्या नोंदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात हेल्मेटशिवाय प्रवास करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवली जाणार आहे.दुचाकीस्वार आणि त्याच्या सहप्रवाशांनी हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. या संदर्भात कायद्याने आधीच दंडाची तरतूद केली आहे. मात्र हेल्मेट न घालणाऱ्या सहप्रवाशावर अशी सक्तीची कारवाई करण्यात आली नाही. तसेच हेल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. यासंदर्भात विशेष मोहीमही राबविण्यात येत होती. मात्र या नव्या सूचनांनंतर सहप्रवाशांवरील कारवाईतही वाढ होणार आहे.यावर्षी, पोलिसांनी हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांविरुद्धची कारवाई अधिक तीव्र केली आहे. 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुंबई वाहतूक पोलिसांनी दोन वर्षांत 107 कोटी रुपयांची 8 लाख 27 हजार 812 ई-चलान दंडात्मक कारवाई केलीय.हेही वाचाजितेंद्र आव्हाडांचा ईव्हीएम मशीनची छेडछाड केल्याचा आरोपअखेर बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळाली
Home महत्वाची बातमी टु व्हिलरवर मागे बसणाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे
टु व्हिलरवर मागे बसणाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे
हेल्मेट नसलेले दुचाकीस्वार (bike riders) आणि मागे बसणाऱ्या सहप्रवाशांवर (rides) कारवाई करण्यात येणार आहेत. राज्य परिवहन विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
त्यामुळे येणाऱ्या काळात दुचाकीस्वार (two wheelers) आणि हेल्मेटशिवाय प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांविरोधात कारवाई आणखी कठोर होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन वर्षात मुंबईतील (mumbai) पोलिसांकडून 1770 हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून आजवर 107 कोटी रुपयांचा दंड वसूल केला गेला आहे.
विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्या सहप्रवासी यांचा अपघातात मृत्यू आणि जखमी होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांवर आणि पाठीमागे बसणारे सहप्रवासी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश परिवहन विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
त्यासाठी वाहतूक पोलिसांचे ई-चलान मशिन बदलून स्वतंत्ररित्या नोंदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात हेल्मेटशिवाय प्रवास करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
दुचाकीस्वार आणि त्याच्या सहप्रवाशांनी हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. या संदर्भात कायद्याने आधीच दंडाची तरतूद केली आहे. मात्र हेल्मेट न घालणाऱ्या सहप्रवाशावर अशी सक्तीची कारवाई करण्यात आली नाही.
तसेच हेल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. यासंदर्भात विशेष मोहीमही राबविण्यात येत होती. मात्र या नव्या सूचनांनंतर सहप्रवाशांवरील कारवाईतही वाढ होणार आहे.
यावर्षी, पोलिसांनी हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांविरुद्धची कारवाई अधिक तीव्र केली आहे. 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुंबई वाहतूक पोलिसांनी दोन वर्षांत 107 कोटी रुपयांची 8 लाख 27 हजार 812 ई-चलान दंडात्मक कारवाई केलीय.हेही वाचा
जितेंद्र आव्हाडांचा ईव्हीएम मशीनची छेडछाड केल्याचा आरोप
अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळाली