मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना घडली आहे. पवईमध्ये आज दुपारी 1 वाजता ही घटना घडली. पवई अँकर ब्लॉकजवळ तानसाच्या 1800 मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्याप्रमाणात पाणी वाया गेले. या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे कामकाज युद्ध पातळीवर सुरू आहे.ही जलवाहिनी फुटल्यामुळे एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शनिवार काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तर काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या भागमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी याची नोंद घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पवईमध्ये आज दुपारी तानसा (पश्चिम) मुख्य जलवाहिनी दुपारी 1 वाजेच्या सुमारास फुटली. या जलवाहिनीतून मोठ्याप्रमाणात पाणी वाया गेले. बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बंद करून पाणी गळती बंद केली. तानसा जलवाहिनीचा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद करून दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पुढच्या 24 तास हे काम सुरू राहण्याची शक्यता आहे. यामुळेच एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.या भागात पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम के पूर्व विभाग प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी १/२, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत, मुकुंद रुग्णालय, टेक्निकल परिसर, इंदिरा नगर, मापकंद नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग, चिमटपाडा, सानबाग, मरोळ, एम. आय. डी. सी. परिसर, रामकृष्ण मंदीर मार्ग, जे. बी. नगर, बागरखा मार्ग, कांती नगर या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.सहार रोड, कबीर नगर, बामणवाडा, पारशीपाडा, विमानतळ वसाहत, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, दौलतवाडी, पी. एन. टी. वसाहत या भागात पाणीपुरवठा बंद राहील.मिलिटरी मार्ग, विजय नगर, मरोळ-मरोशी मार्ग या भागात पाणीपुरवठा बंद राहील.मुलगाव डोंगरी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम. आय. डी. सी.) मार्ग क्रमांक १ ते २३, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडिविटा, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, वाणी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज या भागात पाणीपुरवठा बंद राहील.ओम नगर, कांती नगर, राजस्थान गृहनिर्माण संस्था, साईनगर, सहार गांव, सुतार पाखाडी, कार्गो संकुल या भागात पाणीपुरवठा बंद राहील.एच पूर्व विभाग वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसर, बेहरामपाडा या भागात पाणीपुरवठा बंद राहील.जी उत्तर विभाग धारावी या भागात पाणीपुरवठा बंद राहील.एस विभागगौतम नगर, जयभीम नगर भागात पाणीपुरवठा बंद राहील.फिल्टरपाडा, बेस्ट सर्कल, गांवदेवी, इस्लामिया चाळ या भागात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील. पठाणवाडी, महात्मा फुले नगर या भागात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.कैलास नगर, पासपोली गाव, निटी परिसर, अमृत हॉटेल लगतच्या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.हेही वाचामुंबईत शनिवार आणि रविवारी मुसळधार पावसाची शक्यता
22 ऑगस्ट ठरला मुंबईतील 1969 नंतरचा सर्वात उष्ण दिवस
24 ऑगस्टला ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद