मुंबईत लवकरच रेल्वेचा चेहरा मोहरा बदलणार

बुधवार 24 जुलै रोजी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी 15,940 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर केला. ज्यात त्यांनी मुंबईच्या रेल्वे वाहतुकीसाठी संपूर्ण योजना सादर केली. प्रवाशांसाठी पायाभूत सुविधा राबवण्याचे उद्दिष्ट असलेले सर्वात महत्त्वाचे प्रकल्प पुढीलप्रमाणे : नवीन सिग्नल प्रणाली सुरक्षा आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी दोन उपनगरीय गाड्यांमधील (mumbai local) अंतर कमी केले जाईल. चर्चगेट ते विरार कॉरिडॉरवर कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) प्रणाली बसवली जाईल. ही प्रणाली (signal) दोन गाड्यांमधील अंतर 180 (3 मिनिटे) वरून 150 सेकंद (2.5 मिनिटे) पर्यंत कमी करेल. मुंबई लोकल ट्रेन सेवेत वाढ नवीन सिग्नल प्रणालीमुळे मुंबई (mumbai) उपनगरीय मार्गांवर अधिक ट्रेन सेवा चालवता येतील. पुढील पाच वर्षांत मध्य आणि पश्चिम मार्गावर 250 उपनगरीय रेल्वे सेवा (railway) वाढवल्या जातील. याचा फायदा दररोज सुमारे 75 लाख प्रवाशांना होणार आहे. सध्या, मध्य आणि पश्चिम रेल्वे एकत्रितपणे दररोज सुमारे 3,200 उपनगरीय रेल्वे (local trains) सेवा चालवतात. रेल्वे रुळांचा विस्तार भविष्यातील प्रकल्पांमध्ये रेल्वे रुळांचा विस्तारही करण्यात येईल. यामध्ये विरार ते डहाणू दरम्यानच्या रेल्वे रुळांच्या चौपदरीकरणाचा समावेश आहे. मुंबई सेंट्रल आणि बोरिवली तसेच सीएसएमटी आणि एलटीटी स्थानकांदरम्यान अतिरिक्त मार्गिका जोडल्या जातील. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP)चा एक भाग म्हणून कुर्ला आणि CSMT दरम्यान 5वा आणि 6वा रेल्वे ट्रॅक बसवला जाईल. तसेच नवीन कर्जत-पनवेल उपनगरीय रेल्वे मार्गिकेचेही काम सुरू आहे. नवीन टर्मिनल सध्याच्या टर्मिनल्सवरील दबाव कमी करण्यासाठी मुंबईला चार नवीन रेल्वे टर्मिनस मिळणार आहेत. जोगेश्वरी, वसई, कल्याण आणि पनवेल-कळंबोली येथे हे टर्मिनल्स (terminus) असतील. जोगेश्वरी टर्मिनल या आर्थिक वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल. ते तयार करण्यासाठी 76 कोटी रुपये इतका खर्च येईल. वसई टर्मिनसला मेंटेनन्स हब असेल. हे 162 कोटी रुपये खर्चून बांधले जात आहे. तसेच प्रत्येकी 16 गाड्यांसाठी दोन प्लॅटफॉर्म असतील. कल्याण आणि पनवेल-कळंबोली टर्मिनससाठी अनुक्रमे 850 कोटी रुपये आणि 228 कोटी रुपये खर्च येईल. याशिवाय, मुंबईहून आणखी 50 मेल-एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे. टर्मिनल प्रकल्पासाठी सुमारे 7.5 एकर जमीन लागणार आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प महाराष्ट्र (maharashtra) 5,877 किलोमीटरच्या रेल्वे नेटवर्कमध्ये 81,580 कोटी रुपयांच्या 41 प्रकल्पांवर काम करत आहे. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 128 स्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. राज्यात दरवर्षी 180 किमी नवीन लाईन बसवली जाते. तसेच रेल्वेचे पूर्णपणे विद्युतीकरणही केले आहे. रिसर्च डिझाइन आणि स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन (RDSO)ने कवच 4.0 ला मान्यता दिली आहे. या प्रणालीमुळे स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली वेगवान होईल. यामध्ये सुरक्षिततेवर काम करण्यासाठी ऑप्टिकल फायबर, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचा समावेश आहे.हेही वाचा अटल सेतूवरून उडी घेत तरुण इंजिनिअरची आत्महत्या सीएसएमटी स्थानकावर ऑन ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू

मुंबईत लवकरच रेल्वेचा चेहरा मोहरा बदलणार

बुधवार 24 जुलै रोजी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी 15,940 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर केला. ज्यात त्यांनी मुंबईच्या रेल्वे वाहतुकीसाठी संपूर्ण योजना सादर केली. प्रवाशांसाठी पायाभूत सुविधा राबवण्याचे उद्दिष्ट असलेले सर्वात महत्त्वाचे प्रकल्प पुढीलप्रमाणे :नवीन सिग्नल प्रणालीसुरक्षा आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी दोन उपनगरीय गाड्यांमधील (mumbai local) अंतर कमी केले जाईल. चर्चगेट ते विरार कॉरिडॉरवर कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) प्रणाली बसवली जाईल. ही प्रणाली (signal) दोन गाड्यांमधील अंतर 180 (3 मिनिटे) वरून 150 सेकंद (2.5 मिनिटे) पर्यंत कमी करेल.मुंबई लोकल ट्रेन सेवेत वाढनवीन सिग्नल प्रणालीमुळे मुंबई (mumbai) उपनगरीय मार्गांवर अधिक ट्रेन सेवा चालवता येतील. पुढील पाच वर्षांत मध्य आणि पश्चिम मार्गावर 250 उपनगरीय रेल्वे सेवा (railway) वाढवल्या जातील. याचा फायदा दररोज सुमारे 75 लाख प्रवाशांना होणार आहे. सध्या, मध्य आणि पश्चिम रेल्वे एकत्रितपणे दररोज सुमारे 3,200 उपनगरीय रेल्वे (local trains) सेवा चालवतात.रेल्वे रुळांचा विस्तारभविष्यातील प्रकल्पांमध्ये रेल्वे रुळांचा विस्तारही करण्यात येईल. यामध्ये विरार ते डहाणू दरम्यानच्या रेल्वे रुळांच्या चौपदरीकरणाचा समावेश आहे. मुंबई सेंट्रल आणि बोरिवली तसेच सीएसएमटी आणि एलटीटी स्थानकांदरम्यान अतिरिक्त मार्गिका जोडल्या जातील.मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP)चा एक भाग म्हणून कुर्ला आणि CSMT दरम्यान 5वा आणि 6वा रेल्वे ट्रॅक बसवला जाईल. तसेच नवीन कर्जत-पनवेल उपनगरीय रेल्वे मार्गिकेचेही काम सुरू आहे.नवीन टर्मिनलसध्याच्या टर्मिनल्सवरील दबाव कमी करण्यासाठी मुंबईला चार नवीन रेल्वे टर्मिनस मिळणार आहेत. जोगेश्वरी, वसई, कल्याण आणि पनवेल-कळंबोली येथे हे टर्मिनल्स (terminus) असतील. जोगेश्वरी टर्मिनल या आर्थिक वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल. ते तयार करण्यासाठी 76 कोटी रुपये इतका खर्च येईल.वसई टर्मिनसला मेंटेनन्स हब असेल. हे 162 कोटी रुपये खर्चून बांधले जात आहे. तसेच प्रत्येकी 16 गाड्यांसाठी दोन प्लॅटफॉर्म असतील. कल्याण आणि पनवेल-कळंबोली टर्मिनससाठी अनुक्रमे 850 कोटी रुपये आणि 228 कोटी रुपये खर्च येईल.याशिवाय, मुंबईहून आणखी 50 मेल-एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे. टर्मिनल प्रकल्पासाठी सुमारे 7.5 एकर जमीन लागणार आहे. महाराष्ट्रातील प्रकल्पमहाराष्ट्र (maharashtra) 5,877 किलोमीटरच्या रेल्वे नेटवर्कमध्ये 81,580 कोटी रुपयांच्या 41 प्रकल्पांवर काम करत आहे. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 128 स्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. राज्यात दरवर्षी 180 किमी नवीन लाईन बसवली जाते. तसेच रेल्वेचे पूर्णपणे विद्युतीकरणही केले आहे.रिसर्च डिझाइन आणि स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन (RDSO)ने कवच 4.0 ला मान्यता दिली आहे. या प्रणालीमुळे स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली वेगवान होईल. यामध्ये सुरक्षिततेवर काम करण्यासाठी ऑप्टिकल फायबर, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचा समावेश आहे.हेही वाचाअटल सेतूवरून उडी घेत तरुण इंजिनिअरची आत्महत्यासीएसएमटी स्थानकावर ऑन ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू

Go to Source